Accident | हिमाचल प्रदेशात खासगी बस दरीत कोसळली, शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू
Himachal Pradesh Bus Accident | हिमाचल प्रदेशात खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला.
शिमलाः हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात (Bus Accident) झाला. सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली. यात शाळकरी मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत,शाळकरी मुलांसह जवळपास 16 जणांचा मृत्यू (Death in Accindent) झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अजूनही काही अपघात ग्रस्तांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासकीय कर्मचारी , अधिकारी आणि पोलिसांचे बचावकार्य सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांप्रती सहानूभूती व्यक्त केली आहे. तसेच जखमींना तातडीने उपचार मिळण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.
कुल्लू में हुई बस दुर्घटना में बच्चों की मृत्यु का समाचार विचलित और व्यथित करने वाला है। बच्चों के शोकाकुल परिवारों की वेदना में शामिल हूं। ईश्वर घायलों को जल्द ही पूर्ण स्वस्थ करें। राहत बचाव कार्य तत्परता से संपन्न हों।
— Vice President of India (@VPSecretariat) July 4, 2022
कुठे घडली घटना?
याविषयी हाती आलेल्या माहितीनुसार, कुलू जिल्ह्यातील शैशर येथील एका खासगी शाळेच्या बसला हा अपघात झाला. ही बस जावळा गावापासून जवळपास 200 मीटर अंतरावर असताना दरीत कोसळली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये एका विद्यार्थिनीचाही सहभाग आहे. तर बसचा चालक, कंडक्टर आदी गंभीर जखमी आहेत.
सकाळी पावणे 9 ची घटना
सदर घटनेत सकाळी पावणे नऊ वाजता, बस दरीत कोसळल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान स्थानिकांसमोर होते. ही बस शैंशर येथून परतत होती. बसममध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेले प्रवासी, जखमींना तातडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले.
मृतदेह काढण्याचं आव्हान
कुलू जिल्ह्यात झालेला हा अपघात अत्यंत भीषण होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसमधील 16 जणांचा मृत्यू झाला. बसच्या तुटलेल्या अवशेषांमध्ये हे मृतदेह अडकले होते. ते काढण्याचं मोठं आव्हान बचाव कार्यातील कर्मचाऱ्यांपुढे होते.