हिमंत बिस्व सरमांना आसामचं मुख्यमंत्रिपद का?, पूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय?; वाचा सविस्तर

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हिमंत बिस्व सरमा यांना भाजपने थेट मुख्यमंत्रिपद दिलं आहे. (Himanta Biswa Sarma Bjp North East Trump Card? Know How)

हिमंत बिस्व सरमांना आसामचं मुख्यमंत्रिपद का?, पूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय?; वाचा सविस्तर
Himanta Biswa Sarma
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 12:22 PM

गुवाहाटी: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हिमंत बिस्व सरमा यांना भाजपने थेट मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरमा यांना मुख्यमंत्रिपद देण्यामागचं भाजपचं नेमकं गणित काय आहे? सरमा यांच्याकडे आसामची सूत्रे देण्यामागे भाजपचा नवा प्लान काय आहे? या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा. (Himanta Biswa Sarma Bjp North East Trump Card? Know How)

सरमा राजकीय गरज

सरमा यावेळी राजकारणाची गरज आहे. सर्बानंद सोनोवाल यांनीही मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. म्हणूनच सत्ता राखल्या गेली आहे, असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. 2016च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल आणि 2019मध्ये संपूर्ण नॉर्थ-ईस्टमध्ये भाजपचं नेतृत्व केल्याने सरमा यांना पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाची बक्षिसी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना पूर्वेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक खासदार मिळाले होते.

पूर्वोत्तर राज्यांसाठी

आसाममध्ये एनडीएची सत्ता आणून देण्यास सरमा यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद देऊन पूर्वोत्तर राज्यांवर पकड मजबूत ठेवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. तसेच पूर्वेकडील इतर राज्यांमधील नेत्यांमध्ये त्यांचं महत्त्व मोठं आहे, असं या भाजप नेत्याने सांगितलं. सोनोवाल यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रंजीत कुमार दास यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या जागी त्यांची वर्णी लागू शकते, असंही या नेत्याने सांगितलं.

बंगालमध्ये फटका, आसाम आणि इतर राज्य महत्त्वाचे

2016मध्ये मुख्यमंत्री बनण्याआधी सर्बानंद सोनोवाल हे केंद्रात स्किल डेव्हल्पमेंट राज्य मंत्री होते. त्याशिवाय त्यांच्याकडे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाचा प्रभारही होता. पक्षात 60 आमदारांपैकी 42 आमदारांचा सरमांना पाठिंबा असल्याचं भाजप हायकमांडला माहीत होतं. आमदारांच्या एका गटाने सरमा यांना पाठिंबा असल्याचं एक पत्रंही केंद्रीय नेतृत्वाला लिहिलं होतं. त्यामुळे पक्षातील बंड थोपवलं जावं आणि आसाममध्ये स्थैर्य निर्माण व्हावं म्हणून भाजपने सरमा यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवलं. आसाममध्ये गेल्या अनेक वर्षापासून आसामच्या पूर्वकडील नेत्याकडेच आसामचं मुख्यमंत्रिपद आलं आहे. मात्र, पहिल्यांदाच सरमा यांच्या निमित्ताने आसामच्या पश्चिमेकडील व्यक्तीकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये फटका बसल्यानंतर पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी सरमा यांचं नेतृत्व उपयोगी ठरणार असल्यानेही सरमा यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संघासाठी सरमा फिट

सोनोवाल यांनी आसामच्या पूर्वेकडून अधिकाधिक आमदार निवडून आणले. त्यामुळे सरमा पश्चिम भागात सर्वाधिक आमदार निवडून आणतील असा आम्हाला विश्वास आहे, असं भाजपचे आमदार बिनोद हजारिका यांनी सांगितलं. सरमा हे काँग्रेसच्या तरुण गोगोई सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र, गोगोईंसोबत वाद झाल्याने त्यांनी 2014मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. आसाममधील भाजपचा कट्टर चेहरा म्हणून सरमा यांची ओळख निर्माण झाली आहे. तसेच सरमा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाठिंबा दिला आहे. (Himanta Biswa Sarma Bjp North East Trump Card? Know How)

संबंधित बातम्या:

आसामच्या मुख्यमंत्रीपदी अखेर हिमंत बिस्वा सरमा; दोन दिवसाच्या जोरबैठकांनंतर अखेर शिक्कामोर्तब

सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, केंद्र सरकार काय करतंय?; बाळासाहेब थोरातांचा संतप्त सवाल

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद आणि हिमंत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलावलं; आज फैसला

(Himanta Biswa Sarma Bjp North East Trump Card? Know How)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.