आसामच्या मुख्यमंत्रीपदी अखेर हिमंत बिस्वा सरमा; दोन दिवसाच्या जोरबैठकांनंतर अखेर शिक्कामोर्तब

दोन दिवसांच्या जोरबैठकांनंतर अखेर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. (Himanta Biswa Sarma will be the next CM of Assam)

आसामच्या मुख्यमंत्रीपदी अखेर हिमंत बिस्वा सरमा; दोन दिवसाच्या जोरबैठकांनंतर अखेर शिक्कामोर्तब
Himanta Biswa Sarma
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 1:49 PM

गुवाहाटी: दोन दिवसांच्या जोरबैठकांनंतर अखेर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज झालेल्या भाजप विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हिमंत बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. सरमा हे आज दुपारी 4च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील, असं सूत्रांनी सांगितलं. (Himanta Biswa Sarma will be the next CM of Assam)

आज सकाळी 11 वाजता दिसपूर येथे भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बीएल संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिंमत बिस्व सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. सर्बानंद यांनी आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, आज दुपारी हिमंत बिस्व सरमा हे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. येत्या दोन दिवसात सरमा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत सरमा?

सरमा यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने 15 मे 2001 पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. 1996 ते 2005 पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिलं आहे. 1 फेब्रुवारी 1969मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम साहित्य संस्थांशी संबंधित आहे. सरमा यांनी कामरुपमध्ये अकादमी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयात त्यांनी पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलं. राजकारणात असतानाच त्यांनी पीएचडीही केली.

वकिलीस प्रारंभ

विज्ञान शाखेचे विद्यार्थी असतानाही त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता. कॉटन कॉलेजमध्ये 1991-92मध्ये ते कॉलेजचे जनरल सेक्रेटरी होते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील म्हणून कामास प्रारंभ केला.

गुरुसोबत मतभेद, काँग्रेस सोडली

माजी मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी त्यांना राजकारणात आणलं होतं. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या मार्गदर्शनात राजकीय नेते म्हणून त्यांची जडणघडण झाली. 1996मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2001मध्ये त्यांनी जालुकबरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने इथूनच सुरुवात झाली. सलग तिसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. गोगोई सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे बडे नेते म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. मात्र, पुढे राजकीय गुरू असलेल्या गोगोईंबरोबर त्यांचे मतभेद झाले. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. (Himanta Biswa Sarma will be the next CM of Assam)

संबंधित बातम्या:

हिमंत बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री?; आज फैसला

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद आणि हिमंत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलावलं; आज फैसला

नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या; शिवसेनेचा गडकरींना फुल्ल पाठिंबा

(Himanta Biswa Sarma will be the next CM of Assam)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.