केवळ 3 महिन्यांत एक कोटी किंमतीच्या हजारो फ्लॅटची विक्री, महाग घरांना का येतेय मागणी

Property registrations: मेट्रो शहरांमध्ये उत्पन्न वाढले आहे. कुटुंबातील सर्व जण नोकरी किंवा उद्योगात गुंतले आहेत. त्यामुळे चांगली घरे घेण्याकडे कल वाढत आहे. चांगली सोसायटी, चांगले लोकेशन आणि हजार स्केअर फुटापेक्षा जास्त किंमतीची घरे लोकांच्या पसंतीला पडत आहेत.

केवळ 3 महिन्यांत एक कोटी किंमतीच्या हजारो फ्लॅटची विक्री, महाग घरांना का येतेय मागणी
flat
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 2:42 PM

स्वप्नातले घर खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. एकेकाळी निवृत्तीनंतर घर घेतले जात होते. परंतु आता काळा बदलला आहे. वयाच्या २५ व्या वर्षी स्वत:चे घर युवक घेऊ लागले आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात घरांना मागणी वाढली. मेट्रो शहरांत आता महाग घरे घेण्याची पद्धत रुजली आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांत एक कोटींपेक्षा जास्त महाग असणाऱ्या १० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, एनसीआर, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्‍नई आणि कोलकातामध्ये महाग घरे घेतली जात आहेत. यंदा २०२४ च्या पहिल्या तिमाहीत घरांची मागणी लक्षणीय वाढली आहे. या तीन महिन्यांत ८६ हजार ३४५ घरांची विक्री झाली आहे. ही वाढ टक्केवारीत ९ टक्के आहे.

कुठे किती घरांची विक्री

ग्‍लोबल प्रॉपर्टी कंसल्‍टेंसी फर्म Knight Frank रिपोर्टनुसार, एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची मागणी वाढली आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्चची तुलना केल्यास ही वाढ ४० टक्के आहे. २०२४ मध्ये एक कोटी पेक्षा जास्त किंमतीचे १०,५५८ घरे दिल्लीत विकली गेली आहेत. मुंबईत ६ हजार ७५ घरांची विक्री झाली आहे. बंगळूरुमध्ये ७,४०१ घरांची विक्री झाली आहे. आश्चर्य म्हणजे ५० लाखांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या घरांची विक्री कमी झाली आहे. परंतु कोट्यवधींचे घरे लोकांना आवडू लागली आहे.

कोणत्या शहरांमध्ये काय राहिला भाव

घरांच्या किंमती वाढल्या असल्या तरी विक्री वाढत आहे. देशातील आठ मेट्रो शहरांमध्ये ही विक्री १३ टक्के वाढली आहे. विशेषत: प्रीमियम सेगमेंटची घरे लोकांच्या पसंतीला उतरत आहे. सर्वाधिक महाग घरांच्या यादीत मुंबई अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत प्रति स्केअर फूटचा दर ₹7,891 रुपयेआहे. बंगळूरमध्ये ₹6145/ तर हैदराबादमध्ये ₹5,655 स्केअरफूट दर आहे.

हे सुद्धा वाचा

का वाढतेय महाग घरांना मागणी

मेट्रो शहरांमध्ये उत्पन्न वाढले आहे. कुटुंबातील सर्व जण नोकरी किंवा उद्योगात गुंतले आहेत. त्यामुळे चांगली घरे घेण्याकडे कल वाढत आहे. चांगली सोसायटी, चांगले लोकेशन आणि हजार स्केअर फुटापेक्षा जास्त किंमतीची घरे लोकांच्या पसंतीला पडत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.