Hariyana Murder : सोनीपतमध्ये पत्नीच्या हत्येची साक्ष देण्यासाठी गेलेल्या पतीची न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून हत्या

वेद प्रकाशने गेल्या वर्षी गावातील कनिका नावाच्या मुलीशी लग्न केले होते आणि कनिकाची हत्या तिचे वडील विजयपाल यांनी केल्याचा आरोप आहे. वेदप्रकाश हा या खटल्यातील मुख्य साक्षीदार असून तो शुक्रवारी न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

Hariyana Murder : सोनीपतमध्ये पत्नीच्या हत्येची साक्ष देण्यासाठी गेलेल्या पतीची न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून हत्या
पत्नीच्या हत्येची साक्ष देण्यासाठी गेलेल्या पतीची न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून हत्या Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 6:18 PM

हरियाणा : पत्नीच्या हत्येची साक्ष देण्यासाठी गेलेल्या पती (Husband)ची न्यायालयाच्या आवारातच गोळ्या घालून हत्या (Murder) केल्याची घटना हरियाणातील सोनीपतमध्ये घडली आहे. जिल्हा न्यायालयाच्या चेंबर क्रमांक 207 बाहेर वेदप्रकाश असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी वेदप्रकाश यांची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच सोनापत पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. (Husband who witnessed his wife’s murder was shot dead in the court premises)

वेदप्रकाशने गावातील मुलासोबत प्रेमविवाह केला होता

मुकीमपूर गावातील रहिवासी असलेल्या वेदप्रकाशचा याच गावात राहणाऱ्या कनिका नावाच्या मुलीशी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून वेदप्रकाश आणि कनिकाच्या कुटुंबात वाद सुरू होता. मुलीचे वडील विजय पाल यांनी आपल्या एका साथीदारासह आधी मुलगी कनिकाची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह गंगा कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. वेदप्रकाश हा पत्नीच्या हत्येच्या खटल्यातील मुख्य साक्षीदार होता आणि तो न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला असता, दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

वेदप्रकाशच्या पत्नीची तिच्याच वडिलांनी केली हत्या

वेद प्रकाशने गेल्या वर्षी गावातील कनिका नावाच्या मुलीशी लग्न केले होते आणि कनिकाची हत्या तिचे वडील विजयपाल यांनी केल्याचा आरोप आहे. वेदप्रकाश हा या खटल्यातील मुख्य साक्षीदार असून तो शुक्रवारी न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध घेत आहेत, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वजीर सिंह यांनी सांगितले. (Husband who witnessed his wife’s murder was shot dead in the court premises)

इतर बातम्या

Bihar : पटनामध्ये मोबाईलवर बोलता बोलता मॅनहोलमध्ये पडली महिला, लोकांनी केवळ 18 सेकंदात वाचवले प्राण

Murder Mystery: जावेदसोबतच्या लग्नानंतही रुबिनाचे विवाहीत जितेंद्रशी संबंध! नवऱ्याला रुबिना म्हणाली, ‘जावेद माझा भाऊए!’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.