नवऱ्याची अजब मागणी, लग्नासाठी ठेवली वजन कमी करण्याची अट, 12 किलो वजन घटवले तेव्हा केला साखरपुडा, लग्नापर्यंत ‘इतके’ किलो कमी करण्याचे टार्गेट
ही मागणी प्रत्यक्षात गुजरातमधील एका वराने बिहारच्या एका वधूकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याची ही मागणी मान्यही करण्यात आली. या वधूने अवघ्या ७० दिवसांत १२ किलो वजन कमी केले, त्यानंतर त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. आता तिच्यासमोर लग्नाआधी २५ किलो वजन कमी करण्याचे टार्गेट देण्यात आलेले आहे. ही कहाणी एका मुलीची नाही, अशा लाखो मुली वेठीला धरल्या जातायते.
पटना– लग्न समारंभात आजही आपल्याकडे पारंपरिक पगडा आहे. लग्नाचं (Marriage)स्वरुप, पद्धती बदलल्या, लग्न हायफाय झाली असली तरी वरपक्षांच्या मागण्या (Demands of husband)मात्र बदललेल्या नाहीत. उलट त्यांच्या मागण्यांमध्ये नवनव्या मागण्यांची भर पडताना दिसते आहे. पहिल्यांदा वरपक्ष राजदूत किंवा कारची मागणी करत होते, आता तर त्यांचा धीर अधिक वाढला आहे, ते आता वधूचं वजन कमी करुन हवं, (Weight loss demand)अशा मागण्या करु लागले आहेत. हे ऐकताना तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वजन घटवून हवे ही मागणी प्रत्यक्षात गुजरातमधील एका वराने बिहारच्या एका वधूकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याची ही मागणी मान्यही करण्यात आली. या वधूने अवघ्या ७० दिवसांत १२ किलो वजन कमी केले, त्यानंतर त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. आता तिच्यासमोर लग्नाआधी २५ किलो वजन कमी करण्याचे टार्गेट देण्यात आलेले आहे. ही कहाणी एका मुलीची नाही, अशा लाखो मुली वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेठीला आजही धरल्या जातायते.
काय घडला नेमका प्रकार
पटणाच्या राजेंद्र नगरमध्ये राहणाऱ्या रेखा (नाव बदललेले आहे) हिच्या विवाहाची बोलणी गुजरातच्या एका मोठ्या व्यावसायिकाच्या घराशी सुरु झाली. जवळपास लग्न नक्की होत होते, मात्र मुलगी पाहिल्यानतर तिच्या जाडेपणाचे कारण देत स्थळ नाकारण्यात आले. मुलीची उंची ४ फूट ११ इंच होती, तर वजन ७४ किलो होते. मुलाच्या आईनेच हे स्थळ नाकारले. त्यानंतर वधू पक्षाने अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर, मुलाच्या आईने वजन कमी केलेच तर या मुलीचा स्वीकार सून म्हणून करीन असे सांगितले. या मुलीनेही हे आव्हान म्हणून स्वीकारले. मुलगी थेट डाएटिशेनकडे गेली आणि तिने डाएट चार्ट केला आणि वर्क आऊटही सुरु केले.
डाएटेशिनने वजन केले कमी
ही मुलगी चार महिन्यांपूर्वी आल्याची माहिती डायएटिशेनने दिली. तिच्या वयानुसार आणि उंचीनुसार तिचे वजन अधिक होते, असेही त्यांनी सांगितले. तिचे वचन ४७ ते ४८ किलो असायला हवे हवे होते, ते प्रत्यक्षात ७४ किलो होते. वजन कमी करण्याची जिद्द या मुलीत होती. त्यानंतर डाएटिशेनने दिलेल्या प्लॅनप्रमाणे तिने व्यायाम आणि आहार घेतला. अवघअया ७० दिवसांत तिने वजन १२ किलो कमी करुन दाखवले. त्यानंतर ही माहिती वरपक्षाकडे देण्यात आली.
वरपक्षाला मुलीची जिद्द आवडली
तिने ७० दिवसांत १२ किलो वजन कमी केल्याने तिची जिद्द वरपक्षालाही आवडली. त्यांनी या दोघांचा साखरपुडा धामधुमीत केला. आता य़ा मुलीने २५ किलो वजन कमी करण्याचे टार्गेट ठेवले आहे, तेही लग्नापूर्वी वजन कमी करायची तिची इच्छा आहे. आता तिचे वजन ६१ किलो झाले आहे.
कोरोनाच्या काळात वाढले होते वजन
या मुलीला कोरोना झाला होता. उपचारादरम्यान तिला स्टेरॉईड्स आणि इतर औषधे देण्यात आली, त्यामुळे तिचे वजन चांगलेच वाढले होते. एरोबिक्स आणि डान्स करुनही तिचे वजन कमी होत नव्हते. त्यानंतर तिचा दिनक्रमच पूर्ण बदलण्यात आला आणि तिच्या डाएटबाबत पूर्ण दिवसाचे नियोजन करण्यात आले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे वेळापत्रकच बनवण्यात आले. त्याच्यानुसार व्यायाम आणि आहार घेऊन या मुलीने तिचे वजन कमी करुन दाखवले आहे.
लग्नात सध्या येतेय जाडेपणाची अडचण
सध्या मुलींच्या जाडेपणामुळे लग्न मोडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे जाड असलेल्या मुलींच्या कुटुंबात हा चिंतेचा विषय ठरतो आहे. जाडेपणा कमी करण्यासाठी आधी मुलींची स्वप्रेरणा फार महत्त्वाची असल्याचे डाएटिशन सांगतायेत. त्यासाठी एक टार्गेट ठेवूनच वजन कमी करावे लागेल असेही ते सांगतायेत. वजन कमी करण्यासाठी जबरदस्ती करुन काहीही होणार नाही. यासाठी मेहनत घ्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे.