Anju pakistan | कधीच तुझं तोंड दाखवू नको, अंजू हिच्या पोरीची खदखद; नवराही म्हणाला, आता ती नकोच

सोशल मीडियातून आम्ही जे पाहत आहोत, त्यानुसार तिने लग्न केल्याचं दिसून येत आहे. अंजू खोटं बोलत आहे. तिथूनही ती खोटं बोलत आहे. सर्व काही तीच करते.

Anju pakistan | कधीच तुझं तोंड दाखवू नको, अंजू हिच्या पोरीची खदखद; नवराही म्हणाला, आता ती नकोच
anjuImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 2:00 PM

जयपूर | 27 जुलै 2023 : भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने तिचा प्रियकर नसरुल्ला याच्याशी निकाह केला आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचा निकाहनामाही व्हायरल झाला असून त्यात तिचं नाव फातिमा असं लिहिलं आहे. इस्लाम धर्माचा स्वीकार करून तिने निकाह केला आहे. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. तिचे वडीलच नव्हे तर नवरा आणि मुलगीही तिच्यावर प्रचंड नाराज आहेत. दोघांनीही आता आम्हाला तुझं तोंड पाहायचं नसल्याचं म्हटलं आहे.

अंजूचा नवरा अरविंद हा राजस्थानमध्ये होता. यावेळी त्याने मीडियाशी संवाद साधला. मुलं म्हणतात पप्पा तुम्ही काळजी करू नका. जे होईल ते चांगलंच होईल, असं अरविंद म्हणाला. अंजू खोटं बोलून पाकिस्तानात गेली आहे. ती परत आली तर तिचा स्वीकार करणार नाही. ती तिच्या मर्जीने नसरुल्लाकडे गेली आहे. इथे कुणालाच काही सांगितलं नाही, असंही अरविंद म्हणाला.

हे सुद्धा वाचा

मुलंही नाराज

अंजूच्या या कृतीमुळे मुलंही तिच्यावर नाराज आहेत. मला आईची काहीच गरज नाही. आम्हाला तिचा चेहराही पाहायचा नाहीये, असं मुलीने सांगितल्याचं अरविंदचं म्हणणं आहे. अंजूने दोन वर्षापूर्वी परदेशात नोकरीला जाण्यासाठी पासपोर्ट बनवला होता. आमच्या दोघांमधील संबंध चांगले होते. आमच्यात कोणताही झगडा झाला नाही. थोडीफार वादावादी होतेच, असं सांगतानाच मी कुठे गायब झालो नव्हतो. मी फक्त मीडियासमोर येत नव्हतो. मला मीडियासमोर यायचं नव्हतं. मी आता खूप थकलोय. माझी प्रकृती ठिक नाहीये, असं त्याने सांगितलं.

अंजू खोटं बोलतेय

सोशल मीडियातून आम्ही जे पाहत आहोत, त्यानुसार तिने लग्न केल्याचं दिसून येत आहे. अंजू खोटं बोलत आहे. तिथूनही ती खोटं बोलत आहे. सर्व काही तीच करते. वर खोटंही बोलत आहे. मुलंही तिच्याशी बोलण्यास तयार नाहीत. मुलांशीही ती खोटं बोलत आहे, असा दावा त्याने केला. अंजू पैसा प्रचंड खर्च करायची. तिने अनेकांकडून उधारी घेतली होती. जे ठरवलं तेच करण्याची तिची सवय हती. ही सवय बदलण्याबाबत मी तिला अनेकदा सांगितलं. पण ती ऐकतच नव्हती, असंही त्याने सांगितलं.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.