कलयुग यालाच म्हणतात, मुलाकडे ३० कोटींची संपत्ती, पण आई-वडिलांना भाकरी देत नाही, मग त्यांनी काय केले

हे घटना वाटून तुमच्या डोळ्यात आश्रू येतील. नातू IAS, मुलाकडे ३० कोटींची संपत्ती पण सख्खे आई-बाप भाकरीसाठीही निर्बल झाले होते. त्यांनी पोलिसांना फोन केला. अन् सर्व काही पत्रात लिहून दिले. आता या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलयुग यालाच म्हणतात, मुलाकडे ३० कोटींची संपत्ती, पण आई-वडिलांना भाकरी देत नाही, मग त्यांनी काय केले
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 1:06 PM

चरखी-दादरी, हरियाणा :  मी जगदीशचंद्र आर्य. माझ्या मुलाकडे 30 कोटींची संपत्ती आहे. परंतु मला देण्यासाठी दोन वेळची भाकरी नाही. मग मी लहान मुलाकडे राहत होतो. परंतु त्याचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले. काही दिवस त्याच्या पत्नीसोबत राहिलो. परंतु तिने चुकीची कामे करणे सुरु केले. त्याला मी विरोध करताच मला घरातून हाकलून लावले, अशी सुसाइट नोट हरियाणातील चरखी दादरी येथील भारतीय प्रशासकीय सेवा IAS असणाऱ्या व्यक्तीच्या अजोबाने लिहिली. अन् आपले जीवन संपवले. या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, जी त्यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांच्या ताब्यात दिली. एका आई-वडिलांची कलयुगातील ही सत्याकथा आहे.

कोण आहे तो अधिकारी

हरियाणा केडरमधील एका IAS अधिकाऱ्याच्या आजी अजोबांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यांनी विष प्राशन केले होते. पोलीस पोहचले तेव्हा त्यांच्याकडे सुसाइड नोट दिली. गोपी येथील रहिवासी जगदीश चंद्र आणि भागली देवी यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला. त्यांचा वीरेंद्र आर्य हा मुलगा आहे तर विवेक आर्य हा नातू २०२१ मध्ये आयएएस झाला. त्याला हरियाणा कॅडर मिळाले. जगदीश चंद्र आणि त्यांची पत्नी भागली देवी यांनी बुधवारी आत्महत्या केली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

जगदीशचंद्र यांनी सुसाईड नोट पोलिसांना दिली. प्रकृती बिघडल्याने वृद्ध दाम्पत्याला प्रथम बधडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयात पोहोचून पोस्टमॉर्टमसाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा होती.

काय लिहिले सुसाईड नोटमध्ये

सुसाईड नोटमध्ये जगदीश चंद्र यांनी लिहिले आहे की, मी जगदीश चंद्र आर्य तुम्हाला माझी व्यथा सांगतो. माझ्या मुलांची बधड्यात 30 कोटींची मालमत्ता आहे, पण मला देण्यासाठी त्यांच्याकडे दोन भाकरी नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. 6 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. काही दिवस पत्नीने सांभाळ केला, पण नंतर ती चुकीचे कामे करु लागली. तिला मी विरोध केला तेव्हा मला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो आणि परत आल्यावर त्यांनी घराला कुलूप लावले. या काळात माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला.

शिळ्या भाकरी आणि खराब दही देत होते

मुले खाण्यासाठी दोन दिवस शिळ्या भाकरी अन् खराब दही देत होते. हे विष किती दिवस खाणार म्हणून मी सल्फासची गोळी खाल्ली. माझ्या मृत्यूचे कारण माझ्या दोन सून, एक मुलगा आणि एक पुतण्या आहेत. या चौघांना सरकारने आणि समाजाने शिक्षा द्यावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्याकडे बँकेत दोन मुदत ठेवी आहेत आणि बधडा येथे दुकान आहे, ते आर्य समाजला द्यावे, असे त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. या प्रकरणी चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....