AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत असाल तर सावध व्हा… ; सुप्रीम कोर्टाने घेतला हा निर्णय

'ह्युमन फाऊंडेशन फॉर पीपल अँड अ‍ॅनिमल्स' या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आज स्थगिती दिली. याचवेळी विशेष रजा याचिकेची दखल घेताना खंडपीठाने भारतीय प्राणी कल्याण मंडळ, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार आणि इतर खाजगी प्रतिवादींना नोटिसाही बजावल्या आहेत.

Supreme Court : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालत असाल तर सावध व्हा... ; सुप्रीम कोर्टाने घेतला हा निर्णय
सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 9:06 PM
Share

नवी दिल्ली : तुम्ही जर रस्त्यावर कुत्र्यां (Dogs)ना खायला घालत असाल तर यापुढे तुम्हाला सावध राहायला हवे. कारण तुमची ही भूतदया तुम्हाला कायदेशीर कारवाई (Legal Action)ला सामोरे जायला भाग पाडू शकते. कारण रस्त्यावरील कुत्र्यांना खायला देण्याचा नागरिकांना अधिकार आहे हे मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने स्पष्ट नकार दिला आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने असा नागरिकांना अधिकार असल्याचे मत मांडून रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. (Important decision of the Supreme Court regarding feeding of stray dogs)

स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

‘ह्युमन फाऊंडेशन फॉर पीपल अँड अ‍ॅनिमल्स’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आज स्थगिती दिली. याचवेळी विशेष रजा याचिकेची दखल घेताना खंडपीठाने भारतीय प्राणी कल्याण मंडळ, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार आणि इतर खाजगी प्रतिवादींना नोटिसाही बजावल्या आहेत. विशेष रजेची याचिका दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नोटीस जारी करा, या नोटीशीला संबंधितांनी सहा आठवड्यात उत्तर द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देणे धोकादायक

याचिकाकर्त्या एनजीओने असा युक्तिवाद केला की, दिल्ल उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमुळे भटक्या कुत्र्यांचा धोका वाढू शकतो. भटके कुत्रे आणि मानवांनी पाळलेल्या कुत्र्यांच्या वर्तणुकीतील फरक लक्षात घेण्यात उच्च न्यायालय अपयशी ठरले. भटके कुत्रे मालकीचे नसतात. ते खूप आक्रमक असू शकतात. असंख्य कारणांमुळे भटके कुत्रे चावतात, हल्ला करतात आणि लोकांना व इतर प्राण्यांना मारतात. पाळीव प्राण्यांना चावण्यापासून आणि माणसांवर हल्ला करण्यापासून रोखले जाऊ शकते. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यामुळे सोसायटी, रस्त्यावर, बाजारपेठा, उद्याने किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालणे हे नागरिक, पादचारी, दुचाकीस्वार, लहान मुले आणि वृद्ध यांना थेट धोका आहे, असे म्हणणे याचिकाकर्त्यांनी मांडले आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. (Important decision of the Supreme Court regarding feeding of stray dogs)

इतर बातम्या

Delhi Crime : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केला, वाचा दिल्लीत काय घडले ?

Big Breaking झेलेन्स्की युक्रेन सोडून पळाल्याचा रशियन मीडियाचा दावा, दाव्यात किती तथ्य?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.