Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना

नागरिकांची ओळख पटवण्यात चूक करून गोळीबार केल्याची घटना याआधीही घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेत आसाम रायफल्सच्या जवानाने गोळीबार केला. यात दोन तरुण गावकरी जखमी झाले. हा परिसर विशिष्ट जिल्हा सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा अर्थात AFSPA अंतर्गत समाविष्ट आहे.

Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना
इचलकरंजीत शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 7:05 PM

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील तिरप जिल्ह्यात लष्कराच्या जवानाने ‘चुकून’ दोन नागरिकांवर गोळ्या (Firing) झाडल्या. लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. चासा गावात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. नोकफ्या वांगदान (28) आणि रामवांग वांगसू (23) हे दोन गावकरी नदीत मासेमारी (Fishing) करून घरी परतत होते. या दोघांवर लष्कराच्या जवानाने चुकून गोळ्या झाडल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित दोन गावकऱ्यांना लष्कराने डिब्रूगडमधील आसाम मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये (एएमसीएच) उपचारासाठी दाखल केले आहे. लष्कराच्या जवानाला गावकऱ्यांची ओळख पटवता आली नाही. त्यामुळे ही घटना घडली, असे स्पष्टीकरण लष्कराच्या वतीने देण्यात आले आहे. जखमींपैकी एकाच्या हाताला गोळी लागली आहे, तर दुसऱ्याच्या बोटाला गोळी लागली आहे, असे एएमसीएचचे अधीक्षक डॉ. प्रशांत दिहिंगिया यांनी सांगितले. सध्या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचेही त्यांनी सांगितले. (In Arunachal Pradesh, two civilians were injured in an accidental firing by Army personnel)

गोळीबारात जखमी झालेले दोन्ही नागरिक अनाथ असल्याचा दावा

लष्कराच्या जवानाने ज्या दोघा नागरिकांवर गोळीबार केला, ते दोघेही अनाथ आहेत. यातील एकाच्या हाताला दुखापत झाली आहे आणि दुसऱ्याच्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यासाठी सरकारने भरपाई दिली पाहिजे, असा दावा जखमींसोबत रुग्णालयात आलेल्या एका नागरिकाने केला आहे. तिरप जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष कामरंग तेसिया यांनीही गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. स्थानिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याऐवजी सुरक्षा दलांचे जवान योग्य बुद्धीमत्तेशिवाय “संवेदनाहीन कृत्य” करीत आहेत. त्यामुळे सुरक्षा दले विश्वासार्हता गमावत आहेत, असे कामरंग तेसिया यांनी म्हटले आहे.

आसाम रायफल्सच्या एका जवानाकडून गोळीबार

नागरिकांची ओळख पटवण्यात चूक करून गोळीबार केल्याची घटना याआधीही घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेत आसाम रायफल्सच्या जवानाने गोळीबार केला. यात दोन तरुण गावकरी जखमी झाले. हा परिसर विशिष्ट जिल्हा सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा अर्थात AFSPA अंतर्गत समाविष्ट आहे. योगायोग म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने ईशान्येकडील भागांमध्ये AFSPA मागे घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच ही घटना घडली आहे. आसामचा मोठा भाग वगळता बहुतांश मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश AFSPA अंतर्गत आहेत.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चुकून केलेल्या गोळीबारात 15 नागरिकांचा मृत्यू

शुक्रवारी घडलेल्या घटनेने डिसेंबर 2021 मधील घटनेच्या आठवणीला उजाळा दिला. त्यावेळी सुरक्षा दलांनी नागालँडच्या ओटिंग गावात ओळख पटवण्यात चूक करून केलेल्या गोळीबारात 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ओटिंगच्या घटनेनंतर AFSPA सारख्या कठोर कायद्याच्या अंमलबजावणीवर तसेच सुरक्षा दलांना दिलेली शिक्षा यावरून वाद सुरू झाला होता. गुवाहाटी येथील ‘प्रतिदिन टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी आसाम रायफल्सच्या जवानाने दहशतवादी असल्याचा संशय घेऊन तरुणांवर गोळीबार केला. आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही घटना त्यांच्या चुकीमुळे घडल्याचे मान्य केले आहे तसेच जखमींवर उपचार करण्याची जबाबदारी घेतली आहे. जखमी तरुणांना अधिक उपचारासाठी जोरहाट येथे नेले जाणार आहे. (In Arunachal Pradesh, two civilians were injured in an accidental firing by Army personnel)

इतर बातम्या

Punjab National Bank : उत्तर प्रदेशात पंजाब नॅशनल बँकेवर जबरी दरोडा; रिव्हॉल्व्हरच्या धाकाने 10 लाख लुटले

Harsh Sanghvi: बलात्काराला मोबाईल फोन जबाबदार; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.