Jharkhand Crime : धक्कादायक ! झारखंडमध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

पीडित मुलगी दुकानात फ्रुटी आणण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानात आरोपी मुलगा हा एकटाच होता. त्याने याच संधीचा फायदा घेत मुलीला दुकानातील आतल्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलगी रडत घरी आली आणि तिने सर्व घडला प्रकार आईला सांगितला.

Jharkhand Crime : धक्कादायक ! झारखंडमध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 4:14 PM

झारखंड : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 12 वर्षाच्या मुलाने 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात घडली आहे. मुलीने सदर घटना घरी येऊन सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी तात्काळ तोरपा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर आरोपी मुलाला अटक (Arrest) करत बालसुधारगृहात पाठवले. दरम्यान, 20 एप्रिल रोजीही अशीच धक्कादायलक घटना उघडकीस आली होती. एका 10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला. यापैकी दोन मुलगे 9 वर्षांचे आहेत. अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या कृत्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. (In Jharkhand a 5-year-old girl was abused by a 12-year-old boy)

दुकानात फ्रुटी आणायला गेलेल्या मुलीवर अत्याचार

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुकानात फ्रुटी आणण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानात आरोपी मुलगा हा एकटाच होता. त्याने याच संधीचा फायदा घेत मुलीला दुकानातील आतल्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलगी रडत घरी आली आणि तिने सर्व घडला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठले आणि घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याची रवानगी रांची येथील बालसुधारगृहात केली.

झारखंडमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये 17 टक्के वाढ

झारखंडमध्ये 2021 मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार झारखंडमध्ये 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये 17 टक्के वाढ झाली आहे. 2020 मध्ये 1368 तर 2021 मध्ये हा आकडा 1671 पर्यंत वाढला आहे. (In Jharkhand a 5-year-old girl was abused by a 12-year-old boy)

इतर बातम्या

Buldana Crime | रोहिणखेडच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, सात आरोपी जेरबंद; आरोपींवर विविध गुन्हे दाखल

Dhule : धुळ्यातून महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न; तलवारीवरून राजकीय खडाजंगी, आरोप-प्रत्यारोपाला उधाण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.