MP Crime : मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीन, दीराकडून तीन वर्षे महिलेवर लैंगिक अत्याचार

लग्नाला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही या जोडप्याला मूल होत नव्हते. विवाहितेने पतीला डॉक्टरांकडून चेकअप करून घेण्यास सांगितले, मात्र पती डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करु लागला. त्यानंतर एक दिवस त्याने पत्नीला मूल पाहिजे तर मोठ्या भावाशी संबंध ठेव असे सांगितले.

MP Crime : मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीन, दीराकडून तीन वर्षे महिलेवर लैंगिक अत्याचार
मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 4:38 PM

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाला दोन वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने एका पतीने मुलाच्या इच्छेपोटी पत्नीला मोठ्या भावाच्या स्वाधीन केले. त्यानंतर दिराने महिलेवर तीन वर्षे बलात्कार (Rape) केला. मात्र तरीही महिलेला मूल होत नसल्याने पतीने तिला घरातून हाकलून दिले. लज्जास्पद बाब म्हणजे पती आणि मोठी जावेसमोरच दीर महिलेशी संबंध बनवत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार (Complain) दाखल केली. पीडितेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती, दीर आणि जाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित 27 वर्षीय विवाहित महिलेने ग्वाल्हेर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

भिंडच्या गोहाड येथील पीडितेचा विवाह 2015 मध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिजौली येथील तरुणाशी झाला होता. तिचा नवरा आणि दीर ग्वाल्हेरमध्ये एका खासगी कंपनीत काम करतात. लग्नानंतर ती पतीसोबत गोसपुरा येथे भाड्याच्या घरात राहायला आली. येथे तिच्यासोबत दीर आणि जाऊही राहत होते.

काय आहे प्रकरण ?

न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही या जोडप्याला मूल होत नव्हते. विवाहितेने पतीला डॉक्टरांकडून चेकअप करून घेण्यास सांगितले, मात्र पती डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करु लागला. त्यानंतर एक दिवस त्याने पत्नीला मूल पाहिजे तर मोठ्या भावाशी संबंध ठेव असे सांगितले. विवाहितेने यास नकार दिल्याने 20 जुलै 2017 च्या रात्री दीर आणि जाऊ तिच्या खोलीत आले. जावेने आतून दरवाजा बंद केला आणि त्यानंतर दिराने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दररोज दिर तिच्याशी शारिरीक संबंध ठेवू लागला. पती आणि जाऊ रोज तिच्या खोलीत येऊन दिराला शारिरीक संबंध बनवायला सांगायचे. बदनामीच्या भीतीने महिलेने तीन वर्ष सर्व सहन केले. मात्र तीन वर्षानंतरही महिलेला मूल न झाल्याने यावरुन महिलेचा पती आणि दिरामध्ये वाद झाला आणि पती महिलेला कानपूरला घेऊन गेला. (In Madhya Pradesh, brother in law raped a married woman for three years)

हे सुद्धा वाचा

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.