MP Crime : दुसरी तरुणी समजून पत्नीशीच करायचा अश्लील चॅट, महिलेने पतीला अशी घडवली अद्दल
सध्या महिला तिच्या माहेरी राहते. पीडित मनीषाला तिच्या पतीवर संशय आल्याने तिने त्याला फेक फेसबुक आयडीने रिक्वेस्ट पाठवली. सोशल मीडियावर स्वत:ला सिंगल सांगणारा सत्यम आता त्या महिलेशी रोज बोलू लागला. दरम्यान, एके दिवशी फेसबुक चॅटवर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या पत्नीला दुसरी तरुणी समजून चुंबन घेऊन सेक्सची मागणी केली. पीडितेच्या पत्नीने व्हॉट्सअॅपवरील चॅट पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला, याची दखल जिल्हा न्यायालयाने घेतली.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका अय्याश पोलीस हवालदाराचा भांडाफोड त्याच्या पत्नीनेच केला आहे. फेसबुकवर फेक अकाऊंट (Fake Account) बनवून आधी पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीकडून रिक्वेस्ट स्वीकारताच दोघांचे रोज चॅट (Chat)वर बोलणे होऊ लागले. चॅटवर बोलता बोलता पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला दुसरी तरुणी समजून तिच्याकडे किस आणि सेक्सची मागणी (Demand) केली. मात्र बायकोने हकीकत सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली. पतीला अद्दल शिकवण्यासाठीच पत्नीने हे कृत्य केले. सत्यम बहल असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीने पतीचे अश्लील चॅट न्यायालयात सादर केले.
दररोज पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा
इंदूरच्या सुखलिया येथील रहिवासी असलेल्या मनीषा चावंडचा विवाह पंचम की फल येथे राहणारा सत्यम बहल या तरुणाशी 2019 मध्ये झाला होता. काही दिवस सत्यमने मनीषाला आनंदात ठेवले. मात्र त्यानंतर तो बदलला आणि तिचा छळ करण्यास सुरुवात झाली. दररोज आरोपी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे. किरकोळ कारणावरुन पत्नीला कित्येक तास बाथरूममध्ये कोंडून ठेवायचा. तासनतास जमिनीवर बसवून मारायचा. पत्नीकडे माहेरुन मोटारसायकलची मागणी करायचा. अखेर पीडितेने याबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले. यानंतर पीडितेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीच्या अटकेचे आदेश देण्यात आले. सध्या आरोपी जामिनावर बाहेर आहे.
पोटगीपोटी पत्नीला महिन्याला 7 हजार रुपये देण्याचे आदेश
सध्या महिला तिच्या माहेरी राहते. पीडित मनीषाला तिच्या पतीवर संशय आल्याने तिने त्याला फेक फेसबुक आयडीने रिक्वेस्ट पाठवली. सोशल मीडियावर स्वत:ला सिंगल सांगणारा सत्यम आता त्या महिलेशी रोज बोलू लागला. दरम्यान, एके दिवशी फेसबुक चॅटवर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या पत्नीला दुसरी तरुणी समजून चुंबन घेऊन सेक्सची मागणी केली. पीडितेच्या पत्नीने व्हॉट्सअॅपवरील चॅट पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला, याची दखल जिल्हा न्यायालयाने घेतली. पीडितेच्या आरोपावरून इंदूर जिल्हा न्यायालयाने आरोपीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जेवणाचा खर्च म्हणून 2 लाख रुपये, तसेच पोटगी पोटी महिलेला दरमहा 7 हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले.
पतीचे सत्य उघड व्हावे, या उद्देशाने पीडित पत्नीने दुसरी मुलगी असल्याचे दाखवून त्याच्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केले. त्यात स्पेशल ब्रँचमध्ये पोस्ट केलेला जवान सत्यम बहल याने पीडितेशी अश्लील चॅट केले. सध्या पीडितेने योग्य न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. (In Madhya Pradesh obscene chat with the wife of a police constable)