नातू व्हावा यासाठी एकलुत्या एका मुलाविरोधात आई-वडील कोर्टात, नात जन्माला घाला किंवा 5 कोटी परत करा, मुलाकडे आणि सुनेकडे मागणी

नातू किंवा नात व्हावी, यासाठी या दाम्पत्याने थेट मुलाविरोधात कोर्टातच धाव घेतली आहे. मुलावर नाराज असलेल्या या आई वडिलांनी मुलाला सांभाळण्यासाठी आत्तापर्यंत केलेले ५ कोटी रुपये परत मिळावेत अशीही मागणी केली आहे.

नातू व्हावा यासाठी एकलुत्या एका मुलाविरोधात आई-वडील कोर्टात, नात जन्माला घाला किंवा 5 कोटी परत करा, मुलाकडे आणि सुनेकडे मागणी
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 10:19 PM

नवी दिल्ली मुलगा आणि सुनेनं नातवाचं (Grand son)ख दिलं नाही म्हणून एका वयस्कर जोप्यानं थेट कोर्टाची (court)पायरी चढली आहे. जर नातवाला जन्म दिला नाही तर मुलावर आत्तापर्यंत केलेला 5 कोटींचा खर्च परत मिळावा अशी आश्चर्यकारक मागणी त्यांनी केली आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये (Haridwar)कोर्टात ही आश्चर्यकारक केस आली आहे. कोर्टाने या आईवडिलांची याचिका स्वीकारली असून, या प्रकरणी 17 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. एकुलत्या एक मुलाविरोधात हे दाम्पत्य कोर्टात गेले आहे हे विशेष. रंजन प्रसाद यांनी ही याचिका केली आहे, ते निवृत्त अधिकारी आहेत, श्रेय त्यांचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्याविरोधात ते कोर्टात गेले आहेत.

मुलाचे लग्न होवून ६ वर्षे उलटली तरी नातवाचं सुख नाही

रंजन प्रसाद यांचा मुलगा श्रेय पायलट आहे. त्याचा विवाह 2016 साली नोएडात राहणाऱ्या शुभांगी यांच्याशी झाला. लग्नाला सहा वर्षे उलटून गेली तरी मुलाने आणि सुनेने त्यांनी आजीआजोबा होण्याचं सुख दिलेलं नाही, असे या दाम्पत्याने याचिकेत सांगितले आहे. यामुळे या वयस्कर पतीपत्नीचे मानसिक संतुलत ढळले असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

म्हातारपणात एकटे राहणे हा छळ

नातू किंवा नात व्हावी, यासाठी या दाम्पत्याने थेट मुलाविरोधात कोर्टातच धाव घेतली आहे. मुलावर नाराज असलेल्या या आई वडिलांनी मुलाला सांभाळण्यासाठी आत्तापर्यंत केलेले 5 कोटी रुपये परत मिळावेत अशीही मागणी केली आहे. मुलाच्या आणि सुनेवर नाराज असलेले प्रसाद सांगतात की, मुलाच्या शिक्षणावर इतका खर्च केला, मात्र तरीही आता आम्हाला एकट्याने जगावे लागत आहे, हे छळ करण्यासारखेच आहे.

मुलाकडून सुनेकडून अडीच अडीच कोटींची मागणी

रंजन प्रसाद यांनी सांगितले की मी माझ्या मुलावर सगळे पैसे खर्च केले. इतकंच नाही तर त्याला शिक्षणासाठी अमेरिकेतही पाठवले. आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यामुळे जास्त अडचणीत सापडलेलो आहोत. त्यामुळे याचिकेत मुलगा आणि सुनेकडून अडीच अडीच कोटींची मागणी केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.