Kashmir CRPF Attacked: बुरख्यात आली अन् बघता बघता सीआरपीएफच्या कँपवर बाँब टाकून गेली, घटना CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

श्रीनगर जिल्ह्यातील रैनावरी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह गंभीर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kashmir CRPF Attacked: बुरख्यात आली अन् बघता बघता सीआरपीएफच्या कँपवर बाँब टाकून गेली, घटना CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ
जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल बॉम्ब हल्लाImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 8:57 PM

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा बलांवरील हल्ले (Attack) थांबण्याचे नावच घेत नाहीत. मंगळवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरमध्ये एका बुरखाधारी महिलेने सीआरपीएफ नाक्यावर पेट्रोल बॉम्ब (Petrol Bomb) फेकल्याची घटना घडली आहे. महिलेने पेट्रोलने भरलेल्या बॅगेला आधी आग लावली आणि त्यानंतर सुरक्षादला (Security Force)च्या बंकरवर फेकले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, पेट्रोस बॉम्ब टाकणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिला लवकरच अटक केले जाईल, असे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. (In Sopore Jammu and Kashmir a woman terrorist drops a petrol bomb on a CRPF bunker)

श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

दरम्यान, श्रीनगर जिल्ह्यातील रैनावरी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह गंभीर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष माहितीच्या आधारे, पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी असलेल्या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचताच त्यांनी बचावासाठी गोळीबार केला. यावेळी दोघांमध्ये चकमक सुरू झाली.

काश्मीर खोऱ्यात दुख्तरन-ए-मिल्लत ही महिला दहशतवादी संघटना सक्रिय

काश्मीर खोऱ्यात दुख्तरन-ए-मिल्लत ही महिला दहशतवादी संघटना सक्रिय आहे. ही संघटना काश्मीरमध्ये इस्लामिक कायदा प्रस्थापित करण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी जिहादचे समर्थन करते. या संघटनेची स्थापना 1987 मध्ये आसिया अंद्राबीच्या नेतृत्वाखाली झाली. अंद्राबी आणि तिची सहकारी फहमिदा सोफिसोपोर सध्या तिहार तुरुंगात आहेत. एनआयएने त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आसिया दरवर्षी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकावत असे आणि मुलींना सुरक्षा दलांविरोधात आंदोलन करण्यासाठी भडकवत असे. (In Sopore Jammu and Kashmir a woman terrorist drops a petrol bomb on a CRPF bunker)

इतर बातम्या

Video : पूर्व दिल्ली महापालिकेत लाथा-बुक्क्यांचा प्रसाद आणि शिव्यांची लाखोली! AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी

Tina Dabi Pradeep Gawande: माझ्या आईची अन् त्याची सबकास्ट एकच, टीनानं पहिल्यांदाच प्रदीपचे ‘बोनस’ पॉईंट्स सांगितले

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.