UP Crime : वडिल आणि आजी-आजोबांनी आईला ठार मारले; जिल्हा पंचायत सदस्या श्वेता सिंहच्या मुलीचा आरोप
आपण जेव्हा शाळेत चाललो होतो तेव्हा आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितले होते की, तू जेव्हा शाळेतून येशील तेव्हा तुझी मेलेली असेल, असे श्वेता सिंह यांच्या मुलीने सांगितले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यायाची याचना केली आहे.
उत्तर प्रदेश : बांदा जिल्ह्यातील नगर कोतवाली क्षेत्रातील भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री आणि जिल्हा पंचायत सदस्या श्वेता सिंह (Shweta Sinh) यांचा मृतदेह बुधवारी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र ही आत्महत्या नसून हत्या (Murder) असल्याचा दावा श्वेता सिंह यांची मुलगी गौरीने केला आहे. आपल्या वडिलांनी आपल्या आईची हत्या केल्याचा आरोप श्वेताची मुलगी गौरीने केला आहे. तसेच गौरीने आजी-आजोबांवरही आईचा छळ केल्याचा आरोप केला आहे. आपण जेव्हा शाळेत चाललो होतो तेव्हा आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितले होते की, तू जेव्हा शाळेतून येशील तेव्हा तुझी मेलेली असेल, असे श्वेता सिंह यांच्या मुलीने सांगितले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यायाची याचना केली आहे. (In Uttar Pradesh a BJP woman general secretary’s daughter blamed her father for her death)
मुलगा नसल्याने टोमणेही मारले जायचे
श्वेता सिंह आणि दीपक सिंह यांना तीन मुलीच आहेत. मुलगा नाही. यावरुनही त्यांना टोमणे सहन करावे लागत होते, असे मुलीने सांगितले. पोलिस मुलींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करताना दिसताहेत. कायदा पुरावा मागतो असे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे श्वेताच्या दोन्ही मुलींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय मिळवून देत आईच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, श्वेता सिंह यांनी आपल्या घरच्यांना व्हॉट्सअपवरुन मॅसेजही केला होता. यामध्ये जर आपल्याला काही झाले तर त्यास पती दीपक सिंह जबाबदार असेल असे म्हटले होते.
श्वेताच्या बहिणीकडूनही पतीवर आरोप
श्वेताची मुलगी गौरीसह श्वेताच्या बहिणीनेही त्यांच्या पतीवर आरोप केला आहे. श्वेताचा पती दिपक सिंह तिला मानसिक त्रास द्यायचा. यामुळे ती खूप त्रस्त होती, असे श्वेताच्या बहिणीने सांगितले. श्वेता आणि त्यांचा पती दिपक सिंह यांच्यामध्ये झालेल्या भांडणाचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिपक श्वेताला शिवीगाळ आणि अभद्र भाषा वापरताना दिसत आहे. (In Uttar Pradesh a BJP woman general secretary’s daughter blamed her father for her death)