Kushinagar: चार लेकरं तर गेलीच पण टॉफीवर बसलेल्या माशाही मेल्या, शेवटी मुक्या जीवानं आरोपी शोधलेच
दोन वर्षांपूर्वीही अशी घटना घडवण्याचा प्रयत्न झाला होता. ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी नेहमी दारूच्या नशेत आपले कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी द्यायचे, असे मृत मुलांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. एडीजींनी तपासात कुटुंबाने नमूद केलेले सर्व मुद्दे समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये टॉफी खाल्ल्याने चार मुलांचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घडली आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात (Detained) घेण्यात आले आहे. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. अन्न सुरक्षा पथक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत तपासणी केली असून घटनास्थळावरुन अनेक महत्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत. प्राथमिक माहितीनुसार विषामुळे चार लेकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल. (In Uttar Pradesh, four children and a housefly died after eating toffee)
टॉफी खाल्ल्यानंतर चार मुलांसह माशांचा मृत्यू
आज तकच्या वृत्तानुसार टॉफी खाल्यानंतर चार मुलांचा मृत्यू झाला. इतकेच नाही तर टॉफीच्या रॅपरवर बसलेल्या अनेक माशाही मेल्या, अशी माहिती तेथील स्थानिक लोकांना घटनास्थळी पोहचलेल्या तपास पथकाला दिली. मयत मुलांच्या नातेवाईकांनी हे क्रूर कृत्य केल्याचा संशय असून याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी घटनेची गांभीर्याने दखल घेत शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन तपास पथक तयार करून प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. अन्न सुरक्षा आणि फॉरेन्सिक टीमशिवाय घटनास्थळी स्निफर डॉग्सचाही वापर करण्यात आला. त्यामुळे ज्यांच्या घरी स्निफर डॉग गेले त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींनी नेहमी पीडित कुटुंबाला उद्धवस्त करण्याची धमकी द्यायचे
दोन वर्षांपूर्वीही अशी घटना घडवण्याचा प्रयत्न झाला होता. ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी नेहमी दारूच्या नशेत आपले कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी द्यायचे, असे मृत मुलांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. एडीजींनी तपासात कुटुंबाने नमूद केलेले सर्व मुद्दे समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. कुशीनगरचे एसपी सचिंद्र पटेल यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासोबतच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. (In Uttar Pradesh, four children and a housefly died after eating toffee)
इतर बातम्या
Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये रस्त्यावर अर्भक सोडल्याप्रकरणी तिघांना अटक
Video Photo: पोरगी टल्ली झाली, मुंबई पोलीसांची गच्ची पकडली, मद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा