Swami Prasad Maurya : उत्तर प्रदेशात तणाव; सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कारवर दगडफेक

स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राज्यातील विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधी त्यांनी भाजपला रामराम ठोकून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्याच रागातून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला असावा, असा आरोप मौर्य यांनी केला आहे.

Swami Prasad Maurya : उत्तर प्रदेशात तणाव; सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कारवर दगडफेक
सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कारवर दगडफेक
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 9:42 PM

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे राजकारण दिवसेंदिवस चांगलेच तापत आहे. मंगळवारी कुशीनगर जिल्ह्यात प्रचार करणारे माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्या ताफ्यावर दगडफेक (Stone throwing) करण्यात आली. या दगडफेकीत मौर्य यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा हल्ला भाजपने घडवून आणल्याचा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे. या घटनेमुळे कुशीनगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी यांच्यातील संघर्ष आणखी शिगेला पोहोचला आहे. (In Uttar Pradesh, SP candidate Swami Prasad Maurya’s car was stoned)

निवडणुकीआधी स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिला होता भाजपचा राजीनामा

स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राज्यातील विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधी त्यांनी भाजपला रामराम ठोकून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्याच रागातून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला असावा, असा आरोप मौर्य यांनी केला आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. दगडफेकीमुळे अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे मौर्य यांनी सांगितले. स्वामी प्रसाद मौर्य त्यांच्या समर्थकांच्या प्रचारासाठी जात असताना खलवा पट्टी गावात ही दगडफेकीची घटना घडली.

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको

या घटनेवर समाजवादी पार्टीमधून तीव्र संताप व्यक्त केला आहे. दगडफेकीच्या निषेधार्थ स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला. यादरम्यान सपा उमेदवार स्वामी प्रसाद यांच्याशिवाय त्यांची मुलगी आणि भाजप खासदार संघमित्रा मौर्यही घटनास्थळी पोहोचले. भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी त्यांच्याच पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. स्वामी प्रसाद हे कुशीनगरच्या फाजिलनगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यांत विधानसभेसाठी मतदान होत असून 10 मार्चला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी भाजपशिवाय समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्षही रिंगणात उतरला आहे. अनेक पक्ष रिंगणात उतरले असले तरी मुख्य लढत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच होण्याची शक्यता आहे. (In Uttar Pradesh, SP candidate Swami Prasad Maurya’s car was stoned)

इतर बातम्या

Divorce : गरोदरपणात पत्नीने माहेरी राहणे याला पतीचा छळ म्हणता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Latur Crime : लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी, सिग्नलवरुन झाला वाद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.