Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलमारीत सापडले तब्बल 142 कोटी रुपये! आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले

हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका अलमारीत तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे.

अलमारीत सापडले तब्बल 142 कोटी रुपये! आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले
IT Raids Hyderabad
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:26 PM

हैदराबाद : आयकर विभागाने हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर छापेमारी केलीय. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका अलमारीत तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे. (IT raids Hetero Pharmaceutical office in Hyderabad, Rs 142 crore found in a cupboard)

आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तकं आणि रोख रक्कम मिळून आलीय. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

त्याचबरोबर, जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यासह इतर अनेक कायदेशीर समस्या देखील ओळखण्यात आल्या आहेत. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी 16 लॉकर चालवले जात आहेत.

550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

घरात किती सोनं साठवू शकता?

घरात सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने सोनं खरेदी केलं असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर घरात कितीही सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) माहितीनुसार, तुम्ही घरी सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकता. मात्र, आयकर विभागाकडून घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची तपासणी होऊ शकते. तुमच्या घरात 50 लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे दागिने असतील तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ते नमूद करावे लागते.

आयकर विभागाने याबाबत आणखी काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार लग्न झालेल्या स्त्रीला घरात 500 ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा आहे. तर अविवाहीत स्त्री घरात 250 ग्रॅम तर पुरुषांना घरात 100 ग्रॅम सोने बाळगण्याची मुभा आहे. या सोन्याच्या विक्रीवर भांडवली कर भरावा लागतो.

…तर घरातील सोनं जप्त होईल

प्राप्तिकर अधिनियम 1961च्या कलम 132 नुसार तपासादरम्यान जर संबंधित व्यक्ती सापडलेल्या कोणत्याही मूल्यवान वस्तूला किंवा दागिन्याच्या संदर्भात योग्य माहिती देऊ न शकल्यास किंवा उत्पन्नाचे योग्य स्त्रोत दाखवू न शकल्यास प्राप्तिकर अधिकारी जप्त त्या वस्तू जप्त करू शकतात. प्राप्तिकराशी निगडीत कोणत्याही प्रकरणात जर संबंधित व्यक्तीने मागील वर्षी भरलेला प्राप्तिकर हा विकत घेतलेल्या सोन्याच्या किंमतीशी मेळ खात नसल्यास प्राप्तिकर अधिकारी सोन्याचे दागिने किंवा मूल्यवान वस्तू यांना जप्त करू शकतात. पण एका विशिष्ट मर्यादेच्या खाली आयकर विभागही सोन्याचे दागिने जप्त करु शकत नाही.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं, कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं : चंद्रकांत पाटील

हे तर मुघलांचं राज्य, महिलांचा मानसन्मान यांची संस्कृतीच नाही, सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला

IT raids Hetero Pharmaceutical office in Hyderabad, Rs 142 crore found in a cupboard

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.