Income Tax raids: भारतातील सर्वात मोठा आयकरचा छापा, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा, 36 मशीन, 10 दिवस मोजणी…किती कोटी रुपये जप्त

आयकर विभागाने छापेमारी दरम्यान जमीनीच्या खाली दाबलेल्या किंमती ऐवजचा शोध घेण्यासाठी स्कॅनिंग व्हील वाली मशीनचा वापर केला. या ऑपरेशनसाठी 36 नवीन मशीन नोटा मोजण्यासाठी वापरण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्यामुळे विविध बँकेतील कर्मचाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी बोलवण्यात आले.

Income Tax raids: भारतातील सर्वात मोठा आयकरचा छापा, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा,  36 मशीन, 10 दिवस मोजणी...किती कोटी रुपये जप्त
IT Raid
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 7:12 AM

Income Tax raids: आयकर विभागाकडून बेहिशोबी संपतीच्या शोधासाठी छापेमारी सुरु असते. परंतु भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा पडला होता. ओडिशामध्ये टाकलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती सापडली होती. दहा दिवस हा छापा सुरु होता. दहा दिवस नोटांची मोजणी 36 मशीनच्या साह्याने सुरु होती. पैसे भरण्यासाठी ट्रक आणण्यात आल्या. केंद्र सरकारने हा छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला आहे.

352 कोटींची रक्कम जप्त

केंद्र सरकार ओडिशामधील आयकर छापा टाकणाऱ्या टीमच्या सन्मान केला आहे. त्यामध्ये आयकर विभागाचे निदेशक एस.के.झा, अतिरिक्त निदेशक गुरुप्रीत सिंह यांचा सहभाग आहे. या टीमने बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या अनेक विभाग आणि कार्यालयांवर छापा टाकला होता.10 दिवस चाललेल्या या छाप्यात 352 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली होती. आयकर विभागाचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे ऑपरेशन होते. त्यामुळे या छाप्याची देशभर चर्चा झाली. या छाप्याची चर्चा देशभरात झाली.

सुरक्षेत ट्रकमधून नेल्या नोटा

आयकर विभागाने छापेमारी दरम्यान जमीनीच्या खाली दाबलेल्या किंमती ऐवजचा शोध घेण्यासाठी स्कॅनिंग व्हील वाली मशीनचा वापर केला. या ऑपरेशनसाठी 36 नवीन मशीन नोटा मोजण्यासाठी वापरण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्यामुळे विविध बँकेतील कर्मचाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी बोलवण्यात आले. घटनास्थळी आयकर विभागाने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. आयकर विभागाने जप्त केलेली रक्कम कठोर सुरक्षा व्यवस्थेत ट्रकमधून नेण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड ही दारू उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे ओडिशामध्ये मुख्यालय आहे. तसेच बीडीपीएल समूह राज्यभर कार्यरत आहे. त्याच्या इतर व्यवसाय विभागांमध्ये बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (फ्लाय ॲश ब्रिक्स), क्वालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड (IMFL बॉटलिंग) आणि किशोर प्रसाद विजय प्रसाद बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.