भारतासोबत युद्धाच्या तयारीत आहे ड्रॅगन? LAC वर तैनात केल्या तोफ

कोणताही हल्ला झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतासोबत युद्धाच्या तयारीत आहे ड्रॅगन? LAC वर तैनात केल्या तोफ
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 8:41 PM

नवी दिल्ली : लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणाव अद्यापही सुरू आहे. अशात आता चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत आपल्या चौक्या तैनात करत असल्याचं समोर आलं आहे. चीनच्या या कारवाईनंतर भारतीय सैन्यही सीमेवर करडी नजर ठेवून आहे. इतकंच नाही तर कोणताही हल्ला झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून पूर्व लडाखमधील LAC वर भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये तणाव सुरू आहे. (india china standoff update dragon is preparing for war with india on lac)

पूर्व लडाखमधील एलएसीवर भारताच्या चौकीसमोर चीनने आपल्या तोफ तैनात केल्याची बातमी समोर आली आहे. चीनच्या या चालीनंतर भारतीय सैन्यानेही सीमेवर आपल्या तोफ तैनात केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या टी -90 आणि चीनच्या टी -15 टँक 200 मीटरच्या अंतरावर समोरासमोर उभ्या आहेत. एलएसीच्या रेजांगला, रेचिन ला आणि मुखोसरी इथं चीनने आपली लाईट टँक टी -15 तैनात केली आहे. तर दुसरीकडे, चीनची 12 युद्धनौका अंदमान बेटाकडे पाठवण्यासाठीही सज्ज केल्या आहेत. चीनच्या या भयंकर कृत्याबद्दल अमेरिकेने भारतीय नौदलाला इशाराही दिला आहे.

‘चीनला होऊ शकतं मोठं नुकसान’

चीनने पूर्व लडाख सीमेवर डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रं तैनात केली होती. यानंतर भारतीय वायुसेना प्रमुख आर.के.एस. भदोरिया यांनी चीनला इशारा दिला होता की, जर दोन्ही देशांमध्ये थेट संघर्ष झाला तर चीनला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज

चीनच्या कोणत्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. सीमेवर चीनच्या हालचाली लक्षात घेता भारतीय सैन्यही मोठ्या शस्त्रसाठ्यासह तैनात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय सैन्याने 16,000 फूट उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी कपडे, तंबू, खाद्यपदार्थ, इंधन, हीटर आणि संप्रेषण उपकरणेदेखील उपलब्ध करुन दिली आहेत. यासह चीनच्या कोणत्याही कृतीला तोंड देण्यासाठी सैन्याच्या तीन अतिरिक्त विभागांना पूर्व लडाखमध्ये तैनात केले आहे. (india china standoff update dragon is preparing for war with india on lac)

इतर बातम्या – 

अनेक कंपन्या आणि हॉटेलची मालकी; रॉबर्ट वाड्रांची संपत्ती ऐकाल तर चक्रावून जाल!

देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला, अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

(india china standoff update dragon is preparing for war with india on lac)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.