India Corona Update | देशात कोरोनाचा स्फोट, तब्बल 7 पटीने वाढ, दिवसभरात 1.42 लाख नवे रुग्ण, महाराष्ट्राची काय स्थिती ?
देशात कोरोनाचे तब्बल 1 लाख 42 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात देशात 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना बाधितांमधील तब्बल 94 हजार रुग्ण फक्त 5 राज्यात आढळले असून यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशात कोरोनाचे तब्बल 1 लाख 42 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात देशात 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना बाधितांमधील तब्बल 94 हजार रुग्ण फक्त 5 राज्यात आढळले असून यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्यादेखील वाढत आहे.
देशात चोवीस तासांत 1.42 नवे कोरोनाबाधित
देशात मागील 24 तासात 1,41,986 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 40,925 रुग्ण महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील 18,213 रुग्ण, दिल्लीमध्ये 17,335 नवे रुग्ण, तमिलनाडुमध्ये 8,981 तर कर्नाटकमधील 8,449 रुग्णांचा समावेश आहे. आज आढळलेल्या 1.42 रुग्णांमुळे देशात बाधितांचा आकडा आता 3,53,68,372 वर पोहोचला आहे. देशात मागील आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 हजारच्या जवळपास होता. फक्त एका आठवड्यात हा आकडा सहा पटींनी वाढून तब्बल 1 लाख 42 हजारांवर पोहोचला आहे. तर देशात मागील चोवीस तासांत 40,895 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3,44,12,740 वर पोहोचली आहे. सध्या देशात 4,72,169 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत.
देशात ओमिक्रॉन संसर्ग वाढला
देशात मागील चोवीस तासात 285 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंनंतर मृतांचा आकडा 4 लाख 83 हजार 463 वर पोहोचला आहे. मागील दोन दिवसांपासून रोज 300 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र आता मृतांची संख्या घटली असून आकडा 285 वर पोहोचलाय. राज्यात ओमिक्रॉनचा संसर्गदेखील वाढला आहे. ओमिक्रॉन एकूण 27 राज्यात पोहोचला असून आता 3,071 नवे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. मागील चोवीस तासांत 1,203 रुग्ण ओमिक्रॉनमधून मुक्त झाले आहेत.
27 राज्यात पोहोचला ओमिक्रॉन
दरम्यान, सध्या कोरोना संसर्ग वाढला असून ओमिक्रॉन विषाणूदेखील तब्बल 27 राज्यांत पोहोचला आहे. कोरोनाला थोपवण्यासठी विकएंड कर्फ्यू, मिनी लॉकडाऊन असे निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच शाळा, कॉलेजदेखील बंद करण्यात येत आहेत. दुसरीकडे कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनादेखील कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमुळे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
इतर बातम्या :
Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा