India Corona Update : देशात 12,781 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 18 जणांचा मृत्यू! 

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णावाढीचा धोका पुन्हा वाढतोय. सातत्यानं रुग्णवाढीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. तसंच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस घेण्याचं आवाहनही केलं जातंय. देशातच नव्हे तर मुंबई (Mumbai) ठाण्यासह महाराष्ट्रातही कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं आहे.

India Corona Update : देशात 12,781 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 18 जणांचा मृत्यू! 
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 11:17 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या 12 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना (Corona) रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत देशात 12,781 रुग्णांचं निदान झालं आहे. तर 18 कोरोना रुग्णांचा बळी देलाय. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,33,09,473 वर पोहोचली असून मृतांचा आकडा आता 5,24,873 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) याबाबतची आकडेवारी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णावाढीचा धोका पुन्हा वाढतोय. सातत्यानं रुग्णवाढीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

महाराष्ट्राही कोरोना रुग्णसंख्या वाढली

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहनही केले जातेय. देशातच नव्हे तर मुंबई (Mumbai) ठाण्यासह महाराष्ट्रातही कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं जातंय. देशातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या धडकी भरवणारीच आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बीएमसीने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 2087 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मास्क वापरण्याचे आवाहन

चीनमध्ये 19 जून रोजी 109 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये.  त्यापैकी 38 लक्षणे नसलेले आणि 71 लक्षणे असलेले रूग्ण आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी दिलीये. भारतामधील कोरोना रूग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या असतील तर बुस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जाते आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर देखील भर देणे महत्वाचे आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.