लोकसंख्येत भारताने टाकले चीनला मागे, आता जगात भारत नंबर वन

UNFPA : भारताने लोकसंख्येत चीनला मागे आता मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या United Nations Population Fund कडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे.

लोकसंख्येत भारताने टाकले चीनला मागे, आता जगात भारत नंबर वन
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 3:10 PM

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेली बाब आता घडली आहे. भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर गेला आहे. भारताच्या तुलनेत चीनची लोकसंख्या 29 लाख कमी आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे तर भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या United Nations Population Fund कडून ही आकडेवारी जाहीर झाली आहे. जगाची लोकसंख्याही आता आठ बिलियनपेक्षा जास्त झाली आहे.

जगाची लोकसंख्या किती

युनोकडून World Population Report, 2023 जाहीर करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या आठ बिलिअनपेक्षाही अधिक झाली आहे. यात भारत आणि चीनचा सर्वात जास्त वाटा आहे. यो दोन्ही देशांत जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत.

हे सुद्धा वाचा
  • अहवालातील वैशिष्ट्ये
  • भारताचा प्रजनन दर सरासरी २.० आहे. सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे.
  • २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आर्युमान ६९ वय होतं.
  • भारतीय लोकसंख्येत ६८ टक्के लोक १५ ते ६४ वयोगटातील
  • २० कोटींहून अधिक लोकसंख्या १५ ते २४ या तरुण वयोगटातील

चीनची लोकसंख्या घसरली

गेली अनेक वर्षे चीन देश लोकसंख्येच्याबाबतीत जगभरात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, गेल्यावर्षी चीनची लोकसंख्या पहिल्यांदा घसरली. तसेच यंदाही लोकसंख्येत घसरण झालेली आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १४४.८५ कोटी होती. तर आता चीनमध्ये १४२.५७ लोकसंख्या आहे.

सरासरी वय वाढले

250 वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी वय होते 28 वर्षे, ते आता 70 वर्षे झाले आहे. सध्या 30 देश असे आहेत, तिथे सरासरी वय 80 वर्ष आहे. 100 देशांत सरासरी वय 70 वर्ष आहे. आपल्या देशात हा आकडा 69.8 वर्ष आहे.

मृत्यूदरात मोठी घट

जन्म दराच्या तुलनेत घटलेला मृत्यू दर हेही महत्त्वाचे कारण आहे. 1950 पासून जन्म दर आणि मृत्यूदरात घट होताना दिसते आहे. 1950 मध्ये सरासरी 1000 जणांपैकी 20 जणांचा मृत्यू होत असे. 2020 साली हा आकडा 8 वर पोहचला आहे. 2020 साली जन्मदर 17.96टक्के आहे, तर मृत्यूदर 7.60 टक्के आहे.

बाल मृत्यू दरात घट

बाल मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्यानेही लोकसंख्या वाढीत भर पडलेली आहे. 1990 साली 1000 मुलांपैकी 93 मुलांचा मृत्यू होत असे. आता ही परिस्थिती सुधारलेली आहे. 2020 साली 1000 मुलांपैकी केवळ 37 मुलांचाच मृत्यू होतो आहे. बाल मृत्यूंचे प्रमाण काही ठिकाणीच जास्त आहे. अफ्रिका खंडात ही संख्या आजही जास्त आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.