Coronavirus: गेल्या 24 देशात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण; मृतांचा आकडाही वाढला
गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे.| Coronavirus news cases in India
नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासांत 91,702 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3403 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचे (Coronavirus) प्रमाण घटत होते. हा आकडा अगदी 60 हजारापर्यंत खाली गेला होता. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. (Coronavirus news cases in India)
आता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा 90 हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे दिसत आहे. मात्र, समाधानाची बाब इतकीच की देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,34,580 इतकी आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 91,702
देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,34,580
देशात 24 तासात मृत्यू – 3,403
एकूण रूग्ण – 2,92,74,823
एकूण डिस्चार्ज – 2,77,90,073
एकूण मृत्यू – 3,63,079
एकूण सक्रिय रुग्ण – 11,21,671
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 24,60,85,649
‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच’
व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रसने आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सिनेशन फोटोवर पंतप्रधानांचा फोटो नसावा. आमचा त्याला विरोध आहे, असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदींच्या फोटोला आक्षेप असल्याचं म्हटलं आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटले होते.
India reports 91,702 #COVID19 cases, 1,34,580 discharges & 3,403 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,92,74,823 Total discharges: 2,77,90,073 Death toll: 3,63,079 Active cases: 11,21,671
Total vaccination: 24,60,85,649 pic.twitter.com/0wrWOFIe29
— ANI (@ANI) June 11, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनानंतर देशात नव्या खतरनाक व्हायरसची एण्ट्री? पहिला रुग्ण आढळल्याचा दावा
भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती
(Coronavirus news cases in India)