भारतीय सैनिकांची माणुसकी, रस्ता भरकटलेल्या चिनी सैनिकाला परत पाठवलं
लडाखच्या देमचोक येथे सोमवारी सकाळी चिनी सैनिक पकडण्यात आला होता (Indian Army return PLA Soldiers to China).
लडाख : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या सीमावादावरुन तणाव निर्माण झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. लडाख सीमेवर रस्ता भरकटलेला एक चिनी सैनिक भारताच्या दिशेला आला. मात्र, त्याची विचारपूस केल्यानंतर भारतीय जवानांनी त्या सैनिकाला चिनी सैन्याच्या ताब्यात दिला (Indian Army return PLA Soldiers to China).
लडाखच्या देमचोक येथे सोमवारी (19 ऑक्टोबर) सकाळी चिनी सैनिक पकडला गेला होता. रस्ता भरकटल्याने तो भारताच्या हद्दीत आला होता. तो चिनी सैन्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याजवळ चिनी सैन्याशीसंबंधित ओळखपत्र आणि आणखी काही कागदपत्रे सापडले.
भारताच्या हद्दीत आलेला चिनी सैनिक गुप्तहेर आहे, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, चौकशीनंतर तो चिनी सैन्याचा जवान असल्याचं स्पष्ट झालं. अखेर भारतीय सैनिकांनी मंगळवारी रात्री चुशूल मॉल्डो मिटिंग पॉईंटवर तो जवान चिनी सैन्याच्या ताब्यात दिला (Indian Army return PLA Soldiers to China).
दरम्यान, लडाख सीमेवर काही महिन्यांपूर्वी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव अजूनही कमी झालेला नाही. उलट दोन्ही देशांनी सीमाभागात हजारों सैनिक, मोठा शस्त्रसाठा, क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. दोन्ही देशांचे फायटर जेट्स स्टँडबाय मोडवर आहेत. सध्या दोन्ही बाजूने चर्चा सुरु आहे. मात्र, चीन आपल्या चुका स्वीकारण्यास मान्य नाही.
भारत-चीन सीमावाद सोडवण्यासाठी कोर कमांडर्सची आतापर्यंत सात बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच निषपण्ण झालेलं नाही. या आठवड्यातदेखील कोर कमांडर्सची आठवी बैठक आहे. सातव्या बैठकीत दोन्ही पक्षांचं चर्चेतून प्रश्न सोडवण्याबाबत एकमत झालं होतं.
संबंधित बातमी :