Asia Cup: भारत-पाकिस्तान सामने रद्द करा, दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संतप्त
India vs Pakistan boycott : आशिया चषकासाठी भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला. त्यानंतर आता अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान संघावर बहिष्कार टाकावा अशी मागणी युजर्स करत आहेत.

मुंबई : अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. याबाबत देशभरात संतापाची लाट आहे. केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी ही अनंतनाग दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला एकटे पाडले पाहिजे. पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने ही बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
व्ही.के सिंह म्हणाले की, ‘जोपर्यंत पाकिस्तानला एकटे पाडत नाही तोपर्यंत हे सामान्य राहिल. जर पाकिस्तावर दबाव आणायचा असेल तर त्यांना वेगळे पाडावे लागेल.’
अनंतनागमध्ये तीन जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्करातील कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. व्ही.के सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानला वेगळे पाडत नाही तोपर्यंत हे होतच राहिल. पाकिस्तानी कलाकार असतील किंवा क्रिकेटर यांच्यासोबत संबंध ठेवलेच नाही पाहिजे.’
भारत-पाकिस्तान सामने रद्द होणार?
अनंतनाग बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताने तीन जवान गमावले आहेत. यामुळे देशभरातून संतापाची लाट सुरु आहे. दुसरीकडे आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान खेळत आहेत. भारताने पाकिस्तान सोबत खेळू नये अशी मागणी ही सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय़ घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाकिस्तानसोबतचे सर्व सामने रद्द केले पाहिजे. भविष्यातील देखील पाकिस्तान क्रिकेट सोबत कोणतेही सामने खेळू नये अशी भूमिका सोशल मीडियावर युजर्स घेत आहेत.
STOP all ties with Pak be it cricket or social, till they stop their policy of 1000 cuts to bleed India thru terrorism.#TerrorAttack pic.twitter.com/Rh855HYxhC
— Ravi (@raag30) September 14, 2023
I will stop watching cricket if @BCCI don’t stand for martyred Jawans. #Terrorattack #IndianArmy #INDvsPAK pic.twitter.com/x8ZERIUZmo
— Swayam Sahoo (@IamSwayamm) September 14, 2023
@TikooSahil_ will @BCCI and our great #IndianCricketTeam now condemn & deny playing against @TheRealPCB in #AsiaCup2023 ! I doubt. We #Indian should boycott watching #INDvsPAK match instead. #TerrorAttack #JaiHind https://t.co/SLaMWRQkDB
— Bong Chong (বং-চোঙ) 🐾🐕 (@pgccu) September 14, 2023