शरद पवार म्हणाले, ‘आम्ही एकमेकांना शिव्या घालणारे एकत्र आलो’, विरोधी पक्षांच्या बैठकीतली Inside Story

देशातील 15 विरोधी पक्षांची आज पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय खलबतं झाली याबाबतची इनसाईड स्टोरी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांचं एकत्रितपणे पुढील निवडणुकांना सामोरं जायचं, या मतावर एकमत झालंय. याशिवाय बैठकीत कुणी काय मत मांडलं या विषयाची माहिती समोर आली आहे.

शरद पवार म्हणाले, 'आम्ही एकमेकांना शिव्या घालणारे एकत्र आलो', विरोधी पक्षांच्या बैठकीतली Inside Story
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 5:58 PM

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात आज देशभरातील विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आयोजित केली. या बैठकीला देशभरातील 15 विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची इनसाईड स्टोरी आमच्या हाती लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, या विचारावर सर्वांचं एकमत झालं.

पाटण्यातील बैठकीत सर्व विरोधी पक्षांचा आपण सर्व एक आहोत असा सूर बघायला मिळाला. या बैठकीत संयोजक पदाबाबत चर्चा झाली. तसेच पुढची बैठक ही जुलै महिन्यात ठरविण्यात आली. ही बैठक आता शिमल्यात होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे पुढची बैठक शिमल्यात ठरवण्यात आली. या बैठकीत संयोजक पदाबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘आम्ही एकमेकांना शिव्या घालणारे एकत्र आलो’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत आप आणि काँग्रेसला एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय नात्याचं उदाहरण दिलं. “महाराष्ट्रात 25 वर्ष एकमेकांना शिव्या घालणारे आम्ही एकत्र आलो. मागचं सगळं विसरुन आज आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं शरद पवार आप आणि काँग्रेसला उद्देशून म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अभी नहीं तो कभी नहीं : उद्धव ठाकरे

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पाटण्याच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी देशाला हुकुमशाहीकडे नेत आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. भाजप गरजेप्रमाणे रंग बदलते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान देण्यास तयार : राहुल गांधी

“भाजपसोबत लढायचं असेल तर जुने मतभेद विसरुन एकत्र या. जागावाटपात काँग्रेस समझौता करेल. देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान देण्यास तयार आहे. भाजपची नीती भारत तोडो आहे. भाजपच्या भारत तोडो नीतीला भारत जोडोनं विरोध करतोय”, असं राहुल गांधी म्हणाले.

एकत्र राहून भाजपला 100 जागांवर रोखू : नितीश कुमार

एकत्र राहून भाजपला 100 जागांवर रोखू, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बैठकीत म्हणाले. आपण एकत्र राहिल्यास भाजपचा नक्की पराभव होईल, असं नितीश कुमार म्हणाले. देशातील सांप्रदायिकता धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न मोठे आहेत.

बैठकीत नेमकं काय ठरलं?

देशभरात जवळपास 400 जागांवर एक उमेदवार द्यावा, असा विचार या बैठकीत करण्यात आला. सर्व विरोधी पक्षांनी अंतर्गत मतभेद विसरुन एकजुटीने काम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व विरोधी पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी कमिटी बनवण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांना मोदींविरोधात लढण्यासाठी सोबत घेण्याचे प्रयत्न केले जातील, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या बैठकीत बीआरएस, जेडीएस, वायएसआर काँग्रेस पक्ष सहभागी झाले नाहीत.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.