जमीन विकली, उसनवारीने पैसे घेतले अन् राम मंदिरासाठी एक कोटी दिले, आता त्या व्यक्तीला…

ayodhya ram mandir pran pratishtha | अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापणेची तयारी जोरात सुरु आहे. या कार्यक्रमासाठी स्वत:ची शेती विकून देणगी देणाऱ्यास निमंत्रण दिले आहे. शेती विकल्यानंतर त्यांचे पुरेसे पैसे न जमल्यामुळे नातेवाईकांकडून १५ लाख उसनवार घेतले आणि राम मंदिरासाठी एक कोटीची देगणी दिली.

जमीन विकली, उसनवारीने पैसे घेतले अन् राम मंदिरासाठी एक कोटी दिले, आता त्या व्यक्तीला...
सियाराम गुप्ता
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 12:56 PM

नवी दिल्ली, दि.26 डिसेंबर | अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आता एका सर्वसामान्य व्यक्तीलाही निमंत्रण दिले आहे. अयोध्या राम मंदिरासाठी देणगी देणारे ते पहिले देणगीदार आहेत. त्यांनी राम मंदिरासाठी स्वत:ची शेती विकली होती. त्यानंतर पुरेसे पैसे न जमल्यामुळे नातेवाईकांकडून १५ लाख रुपये उसनवार घेतले आणि राम मंदिरासाठी एक कोटीची देगणी दिली. अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी देणारे ते पहिली देणगीदार आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये राहणारे सियाराम गुप्ता या रामभक्ताला राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण दिले गेले आहे. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिवार आनंदीत झाला आहे.

सियाराम गुप्ता यांनी शेत विकले

सियाराम गुप्ता यांनी श्रीराम मंदिरासंदर्भात न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी देणगी दिली होती. २०१८ मध्ये त्यांनी एक कोटी रुपये दिले होते. त्यासाठी त्यांनी आपली १६ बिघे जमीन विकली. त्यातून ८५ लाख रुपये मिळाले. त्यानंतर एक कोटी रुपये जमले नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतले आणि एक कोटीची देगणी दिली. या देणगीचा कुठेही प्रचार केला नाही.

कोण आहेत सियाराम गुप्ता

सियाराम गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ऑक्टोंबर २०१८ मध्ये एक कोटी रुपयांचा धनादेश राष्ट्रीय स्वयसंवेक संघाच्या काशी प्रांताकडे दिला होता. नोंदीनुसार ते राम मंदिरासाठी देगणी देणारे पहिले देणगीदार आहेत. त्यांना आता २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण दिले आहे. यासंदर्भात त्यांना फोन आला आहे. सियाराम गुप्ता यांनी प्रतापगडमध्येही एक मंदिर बनवले आहे. या मंदिरात ते नियमित पूजा अर्चना करतात. राम मंदिरासाठी निमंत्रण मिळाल्यावर त्यांचा संपूर्ण परिवार आनंदीत झाला आहे. त्यांची मुलगी म्हणाली, राम मंदिरासाठी आम्ही खारीचा वाटा उचलू शकलो, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्टी आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा…

अंगावर हिजाब, खाद्यांवर भगवा, राम मंदिरासाठी मुस्लिम युवती पायीवारी करत मुंबईवरुन अयोध्याकडे

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.