Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांपेक्षा या IPS ची संपत्ती जास्त, शास्त्रज्ञ असताना यूपीएससी क्रॅक करत बनले आयपीएस

IAS-IPS Networth: धडाकेबाज आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये अवकाश कुमार यांचे नाव येते. ते आयआयटी बीएचयूमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांपेक्षा या IPS ची संपत्ती जास्त, शास्त्रज्ञ असताना यूपीएससी क्रॅक करत बनले आयपीएस
IPS Awakash Kumar
Follow us
| Updated on: Apr 06, 2025 | 10:20 AM

IPS Awakash Kumar Success Story: शास्त्रज्ञ असताना यूपीएससी परीक्षा क्रॅक करणारे आयपीएस अधिकारी अवकाश कुमार सध्या चर्चेत आले आहे. अवकाश कुमार केवळ आयपीएस म्हणून चर्चेत नाही तर त्यांच्या संपत्तीच्या बाबतीतही चर्चेत आहे. काही आकडेवारीनुसार अवकाश कुमार यांची संपत्ती मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकापेक्षाही त्यांची संपत्ती जास्त आहे.

बिहारच्या अनेक अधिकाऱ्यांनी 31 मार्च रोजी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. त्यानुसार पटनाचे एसएसपी आकाश कुमार यांच्याकडे एकूण 1.92 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. ती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्र्यांनी 3 महिन्यांपूर्वी मालमत्ता जाहीर केली. त्याचे आकडे पाहिले तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1 कोटी 69 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. म्हणजेच पटना एसएसपी आकाश कुमार यांच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे कमी संपत्ती आहे. बिहारचे डीजीपी विनय कुमार यांच्याजवळ 45.33 लाख रुपयांची संपत्ती आहे.

2012 मध्ये यूपीएससी क्रॅक

भोजपूरच्या सिमराव गावचे रहिवासी असलेले आकाश कुमार पटनाचे एसएसपी आहे. त्यांनी 2012 मध्ये यूपीएससी क्रॅक केली. त्यांचे बालपण वडिलांसोबत बोकारो, झारखंड येथे गेले. पटनाचे एसएसपी बनण्यापूर्वी ते सीआयडीमध्ये एसपी म्हणून काम करत होते आणि त्यांनी गयामध्ये ग्रामीण एसपी, अरा आणि बेगुसरायमध्ये एसपी आणि दरभंगामध्ये एसएसपी म्हणूनही काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

धडाकेबाज आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये अवकाश कुमार यांचे नाव येते. ते आयआयटी बीएचयूमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली.

बिहारमधील अधिकाऱ्यांची मालमत्ता नुकतीच जाहीर झाली. मुख्यमंत्री नितेश कुमार यांचे सचिव असलेल्या कुमार रवी यांच्याकडे एकही गाडी नाही. त्यांच्याकडे रोकड केवळ १५ हजार आहे. बचत बँकेत 10. 11 लाख रुपयांसह एकूण 46.4 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे विविध संस्थांचे 19.5 लाख रुपयांचे बॉन्ड आहे.