AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात

सैनिकांच्या अनेक प्रेरणादायी बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे.

भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात
| Edited By: | Updated on: Jan 07, 2021 | 11:51 PM
Share

जम्मू काश्मीर : थंडीच्या कडाक्यामुळे सध्या संपूर्ण देशाभर शीतलहरी सुरू आहेत. हवामानातील बदलांमुळे तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत एक अशी बातमी समोर आली आहे, जी वाचल्यानंतर तुमचीही छाती अभिमानाने उंचावेल. या घटनेनं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. सैनिकांच्या अनेक प्रेरणादायी बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. हिमवृष्टीच्या वेळी सैनिकांनी एका गर्भवती महिलेला खांद्यावर बसवून रुग्णालयात दाखल केलं. याचा एक व्हीडिओही समोर आला आहे. (jammu kashmir indian army carries pregnant woman to hospital in snow video viral)

तुम्ही पाहताय हा फोटो जम्मू-काश्मीरमधला आहे. जम्मूच्या खोऱ्यात सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. अनेक रस्त्यांवर आणि घरांवर बर्फ पडला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे आरोग्य सेवाही कोलमडली आहे. पण अशा भीषण परिस्थितीतही भारतीय जवानांनी आपली माणुसकी सगळ्यांसमोर ठेवली आहे. त्यांच्या या कामाचं करावं तेवढं कौतूक कमीच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फार्कियान गावात एक महिला गर्भवती होती. तिला अचानक वेदना सुरू झाल्या. पण हिमवृष्टीमुळे तिला रुग्णालयात पोहचणं अशक्य होतं. यामुळे कुटुंबाने सीओबी करलपुरा इथं फोन करून मदतीची विनंती केली. अशा परिस्थितीत भारतीय सैनिक आणि काही स्थानिक लोक देवदूतासारखे धावून आले महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केलं.

भारतीय सैनिकांच्या कर्तव्याला सलाम

शबनम बेगम असं गर्भवती महिलेचं नाव होतं. शबनम यांना मदतीची गरज आहे अशी माहिती मिळताच भारतीय जवान तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी तिला खांद्यावर रुग्णालयात दाखल केलं. वेळीच महिलेवर उपचार झाल्यामुळे तिने एका निरोगी गोड बाळाला जन्म दिला आहे.

मुलगा झाल्याच्या आनंदात कुटुंबानेही सगळ्यांना मिठाई वाटली आणि भारतीय जवानांना मदतीबद्दल खास आभार मानले. इतकेच नाही तर संरक्षण मंत्रालयाचे पीआरो उधमपुर, मिनिस्ट्री ऑफ डिफेंस यांच्याकडून याचा एक व्हीडिओही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये भारतीय जवान शबनम यांना हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जात आहेत हे दाखवण्यात आलं आहे. (jammu kashmir indian army carries pregnant woman to hospital in snow video viral)

संबंधित बातम्या – 

पोलिसातला देवमाणूस! तीन दिवसांच्या उपाशी वृद्धेला जीवनदान, भोपाळ पोलिसांची कामगिरी

नागपुरात पोलिस अधिकाऱ्याकडून गर्भवती विन्नीचे डोहाळे जेवण

(jammu kashmir indian army carries pregnant woman to hospital in snow video viral)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.