पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार झाहिद वाणीसह पाच अतिरेक्यांचा खात्मा, जम्मू काश्मीर पोलिसांना मोठं यश
झाहिद वाणी सोबत पाकिस्तानी दहशतवादी वाहिद अहमद रिशी आणि दोन स्थानिक केडरचे सदस्य काफील उर्फ छोटा पाकिस्तानी आणि इनायतुल्लाह मीर या दोघांना देखील कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. लष्कर ए तोयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed ) या अतिरेक्यांना मध्यरात्री झालेल्या चकमकीमध्ये ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दिली आहे. बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये या घटना घडल्या आहेत. काश्मीर पोलीस दलाचे अधिकारी विजयकुमार यांनी जैश ए मोहम्मद चा टॉप कमांडर झाहिद वाणी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांना दिली.झाहिद वाणी हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी घटनेत सहभागी होता. झाहिद वाणीचा खात्मा करण्यात यश आल्यानं सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. पुलवामा आणि बडगाममध्ये झालेल्या घटनांमध्ये पाच दहशतवादी मारण्यात आल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांचं ट्विट
05 #terrorists of #Pakistan sponsored proscribed #terror outfits LeT & JeM killed in dual #encounters in last 12 hours. JeM commander terrorist Zahid Wani & a Pakistani terrorist among the killed. Big #success for us: IGP Kashmir@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) January 30, 2022
जम्मू काश्मीर पोलिसांना मोठं यश
2019 मध्ये 14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या झाहिद वाणीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. झाहिद वाणी सोबत पाकिस्तानी दहशतवादी वाहिद अहमद रिशी आणि दोन स्थानिक केडरचे सदस्य काफील उर्फ छोटा पाकिस्तानी आणि इनायतुल्लाह मीर या दोघांना देखील कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पुलवामाच्या नायरा भागात चकमक
काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी शनिवारी रात्री पुलवामामधील नायरा येथे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीरमधील पुलवामा मध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन राबवून ही कारवाई करण्यात आली. पुलवामाच्या नायरा भागांमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मध्य काश्मीरच्या बडगाम येथील एका चकमकीत दहशतवाद्यांच्या गटाच्या एका अतिरेक्याचा खात्मा छार ए शरीफ भागात करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एके-56 आणि इतर शस्त्रास्त्र जप्त केली आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
इतर बातम्या:
Breaking News | मावळमध्ये पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
Jammu Kashmir Police did encounter of five terrorists including top JeM commander Zahid Wani