AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाई आहे एंटीऑक्सीडेंट गुणांनी पुरेपुर, या आजारांवर रामबाण,पतंजलीचे संशोधन

चमेली म्हणजे जाई ... चमेलीच्या फुलांचा सुंगध सगळ्यांना आवडतो. चमेलीच्या आयुर्वेदिक औषधी गुण तेवढेच महत्वाचे आहेत. चमेलीच्या फुलांचा वापर अनेक आजारांवर होत आहे हे संशोधन पतंजलीने केले आहे.

जाई आहे एंटीऑक्सीडेंट गुणांनी पुरेपुर, या आजारांवर रामबाण,पतंजलीचे संशोधन
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 1:23 PM
Share

आजच्या काळात एंटीबायोटिक रेसिस्टन्सची समस्या वेगाने वाढत आहे. ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेस तर सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इफ्लेमेशनमुळे होणाऱ्या आजाराचा घेरा वाढत आहे. अशात चमेली म्हणजे जाईची फुले एक अनमोल भेट आहे. यात एंटीऑक्सीडेंट क्षमता असून पतंजलीने याचे संशोधन केले आहे

आजच्या काळात माणसाला दोन मोठ्या आरोग्य समस्या निर्माण होत असतात. एक समस्या आहे औषधांच्या प्रति वाढता रेजिस्टन्स आणि दुसरा आहे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस, हा शरीरातील फ्री रेडिकल्समुळे होते. पहीली समस्या ही आहे की अनेक बॅक्टेरिया आणि फंगसमुळे औषधांविरोधात लढणे शिकले आहे. त्यामुळे औषधांचा परीणाम शरीरावर होत नाही. दुसरीकडे फ्री रेडिकल्समुळे आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाढत्या वयाने हृदयाचे आजार आणि कॅन्सरसारखे दुर्धर गंभीर आजार वाढले आहेत. या सर्व समस्यांवर सुटका मिळविण्यासाठी एंटीऑक्सीडेंट गरजेचे आहे.एलोपॅथीमध्ये अनेक औषधे आहेत. परंतू चमलेच्या( जाई ) फुलांमध्ये ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेसला कमी करतो. यात चांगल्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट देखील असते. चमेलीच्या फुलांवर पतंजलीने संशोधन केले आहे.

संशोधनात उघडकीस आले आहे की आयुर्वेदात उपयोगी ठरलेली चमेलीचे ( जाई -Jasminum ) रोपट एंटीबायोटिक रेजिस्टन्स आणि ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेस दोन्हींशी लढू शकते. दोन्ही समस्यांतून त्यामुळे सुटका होते, चमेलीचे विविध प्रकार आहेत, जे बॅक्टीरिया, फंगस आणि फ्री रेडिकल्सपासून आपल्याला वाचविण्यास मदत करतात.हे औषधी रोपटे सुरक्षित आणि परिणाम कारक औषधांचा स्रोत होऊ शकतात.या रोपट्यांमध्ये आढळणारी तत्वं टॅनिन्स, अल्कलॉइड्स, फिनोलिक्स आणि फ्लेवोनॉयड्स, बॅक्टीरिया आणि फंगस वर खोलवर परिणाम करतात आणि यांना नियंत्रणात आणतात. यापासून शरीराला होणारे नुकसान कमी आहे.

फ्री रेडिकल्स आणि ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस

आपले शरीर स्वत: देखील ऑक्सिजनद्वारे फ्री रेडिकल्स तयार करते, ते एका मर्यादेपर्यंत शरीराला गरजेचे असते. परंतू जास्त तयार झाले तर ते आपल्या पेशींचे नुकसान करते. फ्री रेडिकल्स जादा तयार झाल्याने DNA तुटू शकतो. प्रोटीन खराब होते आणि चरबीवर ऑक्सीडेटिव्ह परिणाम होतो. यामुळे कॅन्सर, हृदयाचा आजार आणि वयोमानाशी संबंधिक अनेक समस्याचे हे मूळ आहे. कॅन्सरचे प्रमुख कारण म्हणजे फ्री रेडीकल्स तयार होणे. चमेलीच्या रोपट्यांपासून मिळणारे एंटीऑक्सीडेंट्स या स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारणा करु शकतात. उदाहरणार्थ Prunus domestica आणि Syzygium cumini सारख्या फळांपासून मोठ्या प्रमाणावर एंटीऑक्सीडेंट्स असतात. ज्यामुळे फ्री रेडिकल्सला बेअसर करु शकतात.

चमेलीचे गुण

चमेलीचे रोपटे Oleaceae फॅमिलीचे सदस्य आहेत. जगभरात याच्या सुमारे 197 प्रजाती आहेत. चमेलीच्या फुलांचा सुवास सर्वांना आवडतो. परंतू आयुर्वेदात याचे औषधी गुण देखील महत्वाचे आहेत. चमेलीच्या फुलांचा वापर त्वचा रोग,पिपल्स-पुळ्या, डोळ्यांच्या समस्या बऱ्या होत्यात. या झाडांच्या जगभरात 197 प्रजाती आढतात. त्याचबरोबर, त्याच्या पानांचा वापर स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांमध्ये उपयुक्त आहे. तर महिलांच्या मासिक पाळीच्या अनियमिततेमध्ये ही उपयुक्त आहेत. चमेलीच्या फुलांचा सुंगध सगळ्यांना आवडतो. चमेलीच्या आयुर्वेदिक औषधी गुण तेवढेच महत्वाचे आहेत. चमेलीचे फुलांचा वापर त्वचा रोग,

काही मुख्य प्रजाती आणि उपयोग

Jasminum officinale — वेदनाशामक, मूत्रवर्धक, अँटीडिप्रेसंट

Jasminum grandiflorum — खोकला, उन्माद, गर्भाशयाचे आजार

Jasminum sambac — कामोत्तेजक, जंतुनाशक, सर्दी आणि खोकल्यामध्ये फायदेशीर

जगभर जाईचा प्रसार

जाई प्रामुख्याने भारत, चीन, पॅसिफिक बेटे इत्यादी उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात आढळते. याशिवाय, ते युरोप, अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये देखील आढळते.

काही महत्वपूर्ण संशोधन

Jasminum azoricum पानांपासून मिळणाऱ्या एसिटोन एक्सट्रेक्टमुळे Staphylococcus aureus विरोधात सर्वात जास्त 30 mm चे निषेध क्षेत्र (inhibition zone) दाखवला गेला. Jasminum syringifolium च्या मेथनॉल एक्सट्रेक्टमुळे Shigella flexneri च्या विरुद्ध 22.67 mm निषेध क्षेत्र दाखवले गेले. तर Jasminum brevilobum च्या पानांपासूनच्या तत्वाने S. aureus च्या विरोधात सर्वात कमी MIC (0.05 µg/mL) दाखवला गेला. म्हणजेच खूप कमी प्रमाणात असरकारक. यावरुन हे सिद्ध होते की चमेलीच्या विविध प्रजाती नवीन एंटीबायोटिक पर्यायाच्या स्वरुपात पुढे येत आहेत. खास करुन त्या संक्रमणांपासून वाचवतात ज्यात सर्वसामान्य औषधे फेल होतात.

चमेलीची एंटीऑक्सीडेंट क्षमता

चमेलीची ( जाई )  रोपटी केवळ संक्रमणापासूनच लढत नाहीत तर, ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसच्या विरोधातही ढाली सारखे कार्य करीत असतात. Jasminum grandiflorum आणि Jasminum sambac सारख्या जाती जैविक मापदंडांना ( parameters ) सामान्य करतात ज्या फ्री रेडिकल्समुळे बिघडतात.

कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.