Kanpur violence:अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर होते राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, आणि नमाजानंतर सुरु होती दगडफेक आणि गोळीबार

पोलिसांच्या सुरक्षेतच जुम्म्याची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी जमा झाली, त्यानंतर दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. त्याला विरोध झाल्यानंतर दगडफेक करण्यात आली, काही ठिकाणी हवेत गोळीबाराच्याही घटना घडल्या. 4 तास रस्त्यावर हा हिंसाचार सुरु होता.

Kanpur violence:अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर होते राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, आणि नमाजानंतर सुरु होती दगडफेक आणि गोळीबार
Kanpur violence mastermind arrestImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 9:06 PM

कानपूर – कानपुरात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ 50 किलोमीटर अंतरावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात सहभागी होते. तर दुसरीकडे कानपुरात रस्त्यावर उद्रेक सुरु होता. कानपुरात पैगंबराबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर कानपुरात दगडफेक आणि गोळीबार सुरु होता. या सगळ्या हिंसाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी 12 पोलीस ठाण्यातील पोलीस एकवटले होते, या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली आहे. सात जण यात जखमी झाले आहेत. तर हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

चार तास सुरु होता हिंसाचार

एका भाजपा नेत्याने मोह्हमद पैंगबर यांच्याविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागात बंद पुकारण्यात आला होता. पोलिसांच्या सुरक्षेतच जुम्म्याची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी जमा झाली, त्यानंतर दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. त्याला विरोध झाल्यानंतर दगडफेक करण्यात आली, काही ठिकाणी हवेत गोळीबाराच्याही घटना घडल्या. 4 तास रस्त्यावर हा हिंसाचार सुरु होता. गर्दीला अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या कानपुरात तणाववूर्ण शांतता आहे.

कानपूर बंदचे केले होते आवाहन

जौहर फॅन्स असोसिएशन आणि अन्य मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी मुस्लीम समुदायाला बंदचे आवाहन केले होते. या बंदला मोठा पाठिंबा पाहावयास मिळाला. कानपूर परिसरात असलेले चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हीरामन पुरावा, दलेल पुरावा, मेस्टन रोड, बाबू पुरवा, रावतपुरा या सर्व भागात काही अंशी तर काही ठिकाणी पूर्ण बंद पाळण्यात आला.

पैगंबराबाबतचे वादग्रस्त विधान सहन करणार नाही

जुम्म्याच्या नमाजावेळी मशिदींमध्ये झालेल्या संभाषणात मोहम्मद पैगंबराबाबतचे वादग्रस्त वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला. पोलिसांनी शहरातील कुठल्याही भागात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती. नमाजानंतर अनेक ठिकाणी, चौकांमध्ये गर्दी एकवटली होती. पोलिसांनी या गरदीला समजावून ती पांगवण्याचा प्रयत्न केला.

भाजपा प्रवक्त्याविरोधात गुन्हा दाखल

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी ज्ञानवापी मुद्द्यावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैंगबराबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.