पत्रकार कमाल खान यांना अनोखी श्रद्धांजली, वाराणसीतील आजची गंगा आरती खान यांना समर्पित
कलाम खान हे एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कमाल खान यांची पत्रकारिता नावाप्रमाणेच कमाल होती. त्यामुळेच वाराणसीमध्ये संध्याकाळी पार पडलेली गंगा आरती त्यांना समर्पित करण्यात आली आहे.
मुंबई : राजकीय प्रश्न आणि त्याची उकल, शब्दांची माडणी, बातमी मांडण्याचा लहेजा यामुळे एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान (Kamal Khan) यांचं हृदविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) निधन झालं. कलाम खान हे एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कमाल खान यांची पत्रकारिता नावाप्रमाणेच कमाल होती. त्यामुळेच वाराणसीमध्ये संध्याकाळी पार पडलेली गंगा आरती त्यांना समर्पित करण्यात आली आहे.
बनारस में आज की गंगा आरती कमाल ख़ान को समर्पित pic.twitter.com/YIOztchOfY
— Sanjay Kishore (@saintkishore) January 14, 2022
आज सकाळी कमाल खान यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. कमाल खान हे लखनऊच्या बटलर पॅलेस येथील सरकारी बंगल्यात राहत होते. त्यांची पत्नी रुची कुमार या सुद्धा पत्रकार आहेत. कमाल खान हे एनडीटीव्हीत कार्यकारी संपादक होते. त्यांना रामनाथ गोयंका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
लिजेंड पत्रकार गमावला
कमाल खान यांच्या निधनावर पत्रकारिता क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी यांनी खान यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. कमाल खान यांच्या अचानक जाण्याचा तीव्र धक्का बसला आहे. कमाल आणि रुचीने माझ्यासोबत लखनऊमध्ये नवभारत टाइम्समध्ये काम केलं होतं. कमाल खान हे अत्यंत संतुलित पत्रकार होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
कमाल खान यांनी 13 तासांपूर्वीच उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचं कव्हरेज केलं होतं. हा व्हिडिओ शेअर करत पत्रकार अमन शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. द लिजेंड कमाल खान यांचा शेवटचा पीटीसी. पीटीसीसाठी ते प्रसिद्ध होते. ही कालचीच गोष्ट आहे. आज ते आपल्यात नाहीत. जीवन इतकं चंचल आहे, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.
We are all devastated by the loss of Kamal Khan, an NDTV veteran and one of the country’s best journalists. pic.twitter.com/NZSS2bQOR5
— NDTV (@ndtv) January 14, 2022
इतर बातम्या :