AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kanpur violence:कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड जफर हयात हाशमीसह ३६ जण अटकेत, योगी सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार, तीन बडे पोलीस अधिकारी कानपुरात

चमनगंजमध्ये सरकारी रेशन दुकान चालवणारा जफर हयात हा सोशल मीडियावर सक्रिय होता. वादग्रस्त पोस्टबाबतही त्याच्यावर आरोप झालेले आहेत. गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला हयातने जुलूस-ए-मोहम्मदी असा मोर्चा काढला होता. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कानपूरमधील सीएए आणि एनआरसीच्या विरोधातही तो सक्रिय असल्याची माहिती आहे.

Kanpur violence:कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड जफर हयात हाशमीसह ३६ जण अटकेत, योगी सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार, तीन बडे पोलीस अधिकारी कानपुरात
Kanpur violence mastermind arrestImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 4:37 PM
Share

कानपूर – कानपूर हिंसाचार प्रकरणाचा (Kanpur violence)मास्टर माईंड जफर हयात हाशमी (Mastermind Jafar Hayat)याला अटक करण्यात आली आहे. कानपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच त्याला अटक केल्याची माहिती आहे. आता या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु आहे. जफर हयात याने फेसबुक पोस्ट करुन मुस्लिमांना कानपूर बाजार बंद करण्याचे आणि जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर जो हिंसाचार झाला, त्यासाठी पोलिसांनी जफर हयात हाशमी याला जबाबदार धरले आहे. हिंसाचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली असून, ३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. जफरच्या अटकेनंतर त्याला या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (CM Yogi Aadityanath)सरकारने गांभिर्याने घेतले असून, तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कानपूरला पाठवण्यात आले आहे.

सीएए आणि एनआरसीच्या प्रकरणातही होते जफरचे नाव

चमनगंजमध्ये सरकारी रेशन दुकान चालवणारा जफर हयात हा सोशल मीडियावर सक्रिय होता. वादग्रस्त पोस्टबाबतही त्याच्यावर आरोप झालेले आहेत. गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला हयातने जुलूसमोहम्मदी असा मोर्चा काढला होता. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कानपूरमधील सीएए आणि एनआरसीच्या विरोधातही तो सक्रिय असल्याची माहिती आहे.

कानपूरमध्ये पाच तास सुरु होता हिंसाचार

पैंगबराविरोधात भाजपा प्रवक्त्या नुपूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कानपुरात बंद पुकारण्यात आला होता. सकाळी काही भागात क़डकडीत बंद पुकारण्यात आला. दुपारी काही दुकानदारांनी दुकाने उघडली. नमाजाहून परतणाऱ्य़ा जमावाने चौकाचौकात दुकाने बंद करण्याची जबरदस्ती केली. यावेळी दगडफेक करण्यात आली, तसेच काही समाजकंटकांनी गोळीबारही गेला. थोड्याच वेळात हा जमाव हजारांच्या संख्येवर पोहचला. हा सगळा हिंसाचार थोड्याच वेळात अनियंत्रित झाला. पोलीस छोट्या गल्ल्यांमध्ये जाून कारवाई करण्यास असमर्थ होते.

योगी सरकारचे कठोर कारवाईचे आदेश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कानपूरपासून ५० किमनी अंतरावर कार्यक्रम सुरु असताना, दुसरीकडे कानपुरात हा हिंसाचार झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा प्रकार गांभिर्याने घेतला असून, या प्रकरणी शुक्रवारी रात्रीच उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कानपूरला रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येईल असेही सांगण्यात येते आहे.

जफर हयातचे कुटुंबीय चिंतेत

जफर हयात हे कालपासून सापडत नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे बंद मागे घेतला होता, असा दावा जफर यांच्या पत्नीने केला आहे. जफर नमाजीवरुन घरी परतला होता, त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास हिंसाचार झाल्याचा त्याच्या पत्नीचा दावा आहे. जफर या हिसांचारात सामील नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.