Kartapur Corridor Opens: गुरुद्वारा करतारपूर साहिबच्या दर्शनासाठी आलेल्या भारतीय भाविकांचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत
करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला पंजाबमधील गुरुदासपूरच्या डेरा बाबा नानक गुरुद्वाराशी जोडतो.
भारत सरकारच्या परवानगीनंतर कर्तारपूर कॉरिडॉर 611 दिवसांनंतर बुधवारी पुन्हा खुला झाला. गुरुद्वारा करतारपूर साहिबच्या दर्शनासाठी आलेल्या भारतीय भाविकांचे पाकिस्तानी अधिकारी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने जोरदार स्वागत केले. कॉरिडॉर पुन्हा उघडल्यानंतर त्यांनी भारतीय यात्रेकरूंचे अभिनंदन केले आणि त्यांना पुष्पहार करून अभिवादन केले. त्याचवेळी गुरुद्वारा करतारपूर साहिबचे दर्शन घेऊन परतलेल्या यात्रेकरूंनी भारत सरकारचे आभार मानले. शीख भाविकांची अनेक दिवसांपासून करतारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी होती.
अखेर गुरुपूरापूर्वी केंद्र सरकारने शिखांना मोठी भेट दिली. गृह मंत्री अमित शाहांनी मंगळवारी कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली. करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला पंजाबमधील गुरुदासपूरच्या डेरा बाबा नानक गुरुद्वाराशी जोडतो.
My cabinet will pay obeisance at Sri Kartarpur Sahib as first delegation on Nov 18 after reopening of #KartarpurCorridor ahead of Parkash Purab of Sri Guru Nanak Dev ji. Also, thanks to the PM @narendramodi ji & HM @AmitShah ji for fulfilling demand of ‘Nanak Naam Leva Sangat’.
— Charanjit S Channi (@CHARANJITCHANNI) November 16, 2021