Bird Flu | केरळात बर्ड फ्ल्यूचा कहर; ‘राज्य आपत्ती’ घोषित; चिकन-अंडीची दुकाने बंद
कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. (Kerala declares bird flu as state disaster)
तिरुवनन्तपूरम: कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या राज्यांनी अॅलर्ट जारी केला असून केरळने तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. (Kerala declares bird flu as state disaster)
केरळमध्येही बर्ड फ्ल्यूचा कहर वाढल्याने हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते.
केरळमध्येही यंदा तब्बल 50 हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यापैकी काही पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. राज्यातील इतर पाणथळ प्रदेशांत पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही. मात्र, केरळमध्ये वन्यजीव आणि पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2016 मध्ये केरळमध्ये बर्ड फ्लूची मोठी साथ आली होती.
मध्य प्रदेशातही हाहाकार
मध्य प्रदेशात 23 डिसेंबरपासून ते 3 जानेवारी पर्यंत 376 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे 142 कावळे इंदूरचे आहेत. त्याशिवाय मंदसौरमध्ये 100, आगर-मालवामध्ये 112, खरगोन जिल्ह्यात 13, सीहोरमध्ये 9 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या कावळ्यांचं सँफल टेस्ट करण्यासाठी भोपाळला पाठवण्यात आलं आहे. तर इंदूर आणि मंदसौरमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्यातून हा बर्ड फ्ल्यू असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मंदसौर येथे चिकन आणि अंडीची दुकाने बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. (Kerala declares bird flu as state disaster)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 5 January 2021https://t.co/0zLLxCTOlT#36District72NewsBulletin #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचं मोठं संकट; केरळमध्ये 40,000 पक्ष्यांना मारण्याची वेळ
मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी
बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!
(Kerala declares bird flu as state disaster)