दुदैवाने बापाला रस्त्याने चालताना मुलीबद्दल असभ्य शेरेबाजी ऐकावी लागतेय; केरळ हायकोर्टाचे मत

14 वर्षांच्या मुलीबद्दल अश्लिल शेरेबाजी केली जात असल्याचे ऐकताच मुलीचा बाप असलेल्या निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाने टपोरींना फैलावर घेतले होते. त्यावर शेरेबाजी करणार्‍या टपोरींनी मुलीच्या बापाला (निवृत्त पोलिस अधिकार्‍याला) गंभीर दुखापत झाली. या प्रकरणातील आरोपीने अटकपूर्व जामीनासाठी केरळ उच्च न्यायालयात अर्ज केला.

दुदैवाने बापाला रस्त्याने चालताना मुलीबद्दल असभ्य शेरेबाजी ऐकावी लागतेय; केरळ हायकोर्टाचे मत
प्रेमविवाह केला म्हणून मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क संपत नाहीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 11:32 PM

नवी दिल्ली : बाप आणि किशोरवयीन मुलगी जर दोघे एकत्र रस्त्याने चालत असतील तर त्यांना असभ्य टिप्पण्या (Rude Comments) ऐकाव्या लागतात, ही फार दुर्दैवी परिस्थिती आहे, असे महत्त्वपूर्ण मत केरळ उच्च न्यायालया (Kerala High Court)ने नोंदवले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. हे प्रकार थांबलेच पाहिजे, असेही न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सूचित केले. केरळमध्ये घडलेल्या एका प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार देताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मुलीबद्दलची अश्लिल टिप्पणी ऐकताच मुलीच्या वडिलांनी विरोध केला. त्यावर आरोपीने त्यांना मारहाण केली होती. ही बाब गंभीर असल्याचे न्यायालयाने या प्रकरणात नमूद केले. (Kerala High Court comments on molestation of girls)

आरोपीने मुलीच्या वडिलांना हेल्मेटने केली होती मारहाण

केरळ उच्च न्यायालयापुढे सुनावणीला आलेल्या प्रकरणातील आरोपीने 14 वर्षांच्या मुलीबद्दल असभ्य टिप्पणी केली होती. त्यावर मुलीच्या वडिलांनी आक्षेप घेतल्यामुळे आरोपीने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असलेल्या मुलीच्या वडिलांना हेल्मेटने मारले आणि त्यांना जखमा केल्या होत्या. एखादा माणूस आणि त्याची मुलगी रस्त्याने एकत्र चालत असतील, तर त्यांना अश्लील टिप्पणी ऐकावी लागते हे दुर्दैवी आहे. अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत,’ असे निरीक्षण न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान नोंदवले. दुसरीकडे आरोपीने दावा केला की, मुलीच्या वडिलांनी आपल्यावर आणि त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तीवर हल्ला केला होता. आरोपीच्या या युक्तीवादावर न्यायालय म्हणाले की, कोणत्याही पालकाची ही सामान्य प्रतिक्रिया असू शकते. आपल्या मुलाविरुद्ध अश्लील टिप्पण्या ऐकल्यानंतर कोणत्याही पालकाचा पारा चढू शकतो, तो रागाच्या भरात मारहाण करू शकतो, असे न्यायालय म्हणाले.

14 वर्षांच्या मुलीबद्दल अश्लिल शेरेबाजी केली जात असल्याचे ऐकताच मुलीचा बाप असलेल्या निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाने टपोरींना फैलावर घेतले होते. त्यावर शेरेबाजी करणार्‍या टपोरींनी मुलीच्या बापाला (निवृत्त पोलिस अधिकार्‍याला) गंभीर दुखापत झाली. या प्रकरणातील आरोपीने अटकपूर्व जामीनासाठी केरळ उच्च न्यायालयात अर्ज केला. आरोपीने केलेली अश्लिल शेरेबाजी गंभीर बाब असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज धुडकावून लावला. याचवेळी आरोपीला पोलिसांपुढे शरण येण्याचे निर्देश दिले. (Kerala High Court comments on molestation of girls)

इतर बातम्या 

युट्युब चॅनेलद्वारे भोंदूगिरीचा प्रसार, नरबळीच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Breaking : सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांची चौकशी आता सीबीआयकडे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.