पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट काढलं, 68 वर्षीय पेंटरला थेट 12 कोटींचा जॅकपॉट

केरळमधील एका पेंटरने पैसे सुट्टे करण्यासाठी म्हणून खरेदी केले लॉटरीचे तिकिट. ज्यावेळी या लॉटरीचा निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांना कळले की, आपल्याला 12 कोटीचे लॉटरी लागली आहे. सदानंदन नावाच्या या पेंटराचा आता मिळालेल्या या लॉटरीवर विश्वास बसत नाही आहे.

पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट काढलं, 68 वर्षीय पेंटरला थेट 12 कोटींचा जॅकपॉट
केरळातील पेंटरला लकी ड्रॉ
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 1:26 PM

तिरुअनंतपुरम : केरळ (kerala) येथील अयमानममधील कुदायमपदी येथे राहणाऱ्या पेंटर सदानंदन यांनी 300 रूपये सुट्टे करण्यासाठी म्हणून लॉटरी (lottery) खरेदी केली होती. घरामध्ये साहित्य घेऊन येण्यासाठी म्हणून ते बाजारात गेले होते मात्र त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी लॉटरी खरेदी केली. केरळातील 68 वर्षीय पेंटर असणाऱ्या सदानंदन यांचे नशीब काही मिनिटातच चमकले असून त्यांना आता करोडपती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सदानंदन यांनी पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्यांना 12 कोटीची लॉटरी लागली. कोरोना (Corona) काळात कुटुंबियावर आर्थिक महामारीचे संकट आले असतानाच 12 कोटीच्या लागलेल्या लॉटरीवर त्यांचा आता विश्वास बसत नाही आहे. केरळमधील कुदायमपदी येथे राहणाऱ्या पेंटर सदानंदन यांनी घरामध्ये साहित्य आणण्यासाठी ते बाजारात गेले होतेत. मात्र त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी 300 रूपयांचे लॉटरीचे तिकिट खरेदी केले. लॉटरीचे तिकिट हे त्यांनी लॉटरीचा ड्रॉ काढण्याआधीच काही तासापूर्वी त्यांनी हे तिकिट खरेदी केले होते. त्यानंतर काही वेळातच ते करोडपती बनले आहेत.

सुट्ट्या पैशांच्या शोधात सदानंदन

स्वतःकडे सुट्टे पैसे नसल्याने सदानंदन यांनी लॉटरी विक्रेता सेलवनकडून त्यांनी तिकिट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना पाचशे रूपयांचे सुट्टे पैसे मिळणार होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितल की, ‘पैसे सुट्टे करण्यासाठी मी एका दुकानात जात होतो, मात्र दुपारी लॉटरीचा निकाल जाहीर झाला आणि माझा माझ्या नशीबावर विश्वास बसला नाही.’

सदानंदन सांगतात की, ते पेटिंगच काम करतात पण कोरोनाच्या महामारीने त्यांचे आयुष्य संघर्षमय झाले आहे. त्यांना एक स्वतःचे घर बांधायचे आहे. त्यांना त्यांच्या मुलांचे भविष्य बदलायचे आहे. लॉटरी लागल्यानंतर येणाऱ्या पैशाचे नियोजन त्यांची मुले सनीश आणि संजय यांच्या निर्णयानुसार करायचे आहे.

कित्येक वर्षापासून खरेदी करत होते लॉटरी

सदानंदन सांगतात गेल्या कित्येक वर्षापासून मी लॉटरीचे तिकिट खरेदी करत आहे. या कित्येक वर्षात काही वेळी कधी छोटी मोठी लॉटरी लागली आहे तर कधी काही मिळालेही नाही. मात्र या लॉटरीतील लागलेली ही रक्कम बघून मी कधी याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. सदानंदन यांना लागलेला हा जॅकपॉट राज्य सरकारच्या क्रिसमस न्यू इयर बंपर लॉटरीतूल लागला आहे. या लॉटरीचे दुसरे बक्षीस 3 कोटीचे तर तिसरे बक्षीस 60 लाखांचे होते. माध्यमांच्या अहवालानुसार केरळ लॉटरी विभागाने 24 लाख लॉटरी तिकिटे छापली होता. सर्व तिकिटांची विक्री झाल्यानंतर 9 लाख आणि छपाईदरम्यान 8.34 लाखाची तिकिटे आणखी छापण्यात आली. सदानंदन यांच्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यातही एका रिक्षा चालकाला 12 कोटीची लॉटरी लागली होती.

संबंधित बातम्या

Video : लाख मिळतील, पण तुझ्यासारखी तूच..! वधूला पाहून वराला कोसळलं रडू, नंतर हात धरून मनसोक्त केला डान्स

Video : खिडकीतून घरात घुसत चोरट्यानं पोलिसांना दाखवला डेमो, यूझर्स म्हणाले…

Viral Video : लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर रद्द केल्यानं संतापली नववधू? दुकानातच घातला गोंधळ, पाहा काय केलं…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.