देव देतो आणि कर्म नेतं, रात्रीतून 1448 कोटीचा मालक झाला, पण हातात दमडाही नाही, का?
बाबू जॉर्ज यांनी 1978 मध्ये 3500 शेअर्स खरेदी केले होते. आज त्यांची किंमत 1448 कोटी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता 74 वर्षीय बाबू जॉर्ज आणि त्यांचे कुटुंब हे कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत हे सिद्ध करण्यात गुंतले आहेत.
नवी दिल्ली : कोणीतरी म्हटले आहे की, जेव्हा देव देतो, तेव्हा छप्पर फाडून देतो, ही म्हण आज खरी असल्याचे दिसले. केरळमधील कोची येथील बाबू जॉर्ज वलावी यांच्यासोबतही असेच काहीसे घडले. बाबू एका रात्रीत कोट्यधीश बनले खरे, पण दैवं देतं आणि कर्म नेतं असे म्हणण्याची वेळ आली आहे. बाबू जॉर्ज वळवी यांनी 43 वर्षांपूर्वी 3500 शेअर्स खरेदी केले आणि ते विसरले. पण आज जेव्हा याची आठवण झाली तेव्हा त्याला कळले की, त्या शेअर्सची किंमत 1448 कोटी रुपये आहे. मात्र कंपनी त्यांना हे शेअरचे पैसे देण्यास तयार नाही आणि प्रकरण आता सेबीकडे गेले आहे. (Kerala’s Babu George Valvi bought 3500 shares 43 years ago and forgot about it)
नेमके प्रकरण काय?
बाबू जॉर्ज यांनी 1978 मध्ये 3500 शेअर्स खरेदी केले होते. आज त्यांची किंमत 1448 कोटी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता 74 वर्षीय बाबू जॉर्ज आणि त्यांचे कुटुंब हे कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत हे सिद्ध करण्यात गुंतले आहेत. सांगितले जात आहे की, बाबू जॉर्जने त्याच्या चार नातेवाईकांसह मेवाड ऑईल आणि जनरल मिल्स लिमिटेड(Mewar Oil and General Mills Ltd)चे 3500 शेअर्स खरेदी केले होते. त्यावेळी ही कंपनी उदयपूरची एक सूचीबद्ध नसलेली कंपनी होती.
बाबू जॉर्जने हे शेअर्स एका कंपनीचे वितरक असताना खरेदी केले होते. त्यावेळी 3500 शेअर्स खरेदी करून, ते या कंपनीमध्ये 2.8% भागधारक बनले. कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष पीपी सिंघल आणि बाबू जॉर्ज हे मित्रही होते. त्यावेळी कंपनी अनलिस्टेड होती आणि कोणताही लाभांश देत नव्हती, यामुळे बाबू जॉर्ज आणि त्यांचे कुटुंब आपली ही गुंतवणूक विसरुन गेले.
2015 मध्ये गुंतवणुकीची आठवण झाली
2015 मध्ये बाबू जॉर्ज काही जुनी कागदपत्रे बघत होते. तेव्हा त्यांना आठवले की, त्यांनी उदयपूरच्या एका कंपनीत गुंतवणूक केली होती. बाबू यांच्याकडे मूळ शेअर दस्तऐवज होते आणि त्यांनी शेअर्सबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना माहिती मिळाली की, मेवाड ऑईल आणि जनरल मिल्स लिमिटेड आता पीआय इंडस्ट्रीज बनली आहे आणि ही कंपनी देखील सूचीबद्ध झाली आहे. असे दिसून आले की ही कंपनी देखील नफा कमवत आहे.
जेव्हा बाबू जॉर्जने त्यांच्या शेअर्स संदर्भात कंपनीशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ते कंपनीचा भागधारक नाही आणि त्यांचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला 1989 मध्ये विकले गेले. त्यांनी कंपनीवर डुप्लिकेट शेअर्सचा वापर करून त्यांचे शेअर्स दुसऱ्याला बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप केला आहे. कंपनीने त्यांच्या आरोपाचीही चौकशी केली. यानंतर, 2016 मध्ये, पीआय इंडस्ट्रीजने त्यांना मध्यस्थीसाठी दिल्लीला बोलावले. त्यांनी ते नाकारले. त्यानंतर कंपनीने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी केरळला पाठवले. कंपनीने कबूल केले की त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे मूळ आहेत. असे असूनही कंपनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे.
बाबू जॉर्ज यांनी ठोठावला सेबीचा दरवाजा
कंपनी पैसे टाळाटाळ करीत असल्याने बाबू जॉर्जने सेबीचा दरवाजा ठोठावला. सुमारे सहा वर्षांपूर्वी सेबीकडे तक्रार केल्यानंतरही त्यांना अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. अन्य एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, पीआय इंडस्ट्रीजने सेबीच्या तपासाला उत्तर देताना 1989 मध्ये हे शेअर इतर लोकांना हस्तांतरित केल्याचा दावा केला होता.
बाबू म्हणाले, जर गुंतवणूकदारांची शेवटची आशा समजल्या जाणाऱ्या सेबीने वेळीच कारवाई केली नाही, तर त्याचा काय उपयोग? यामुळे अनेक गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश जाईल की सेबी आणि भारत सरकार या प्रकरणात योग्यरित्या काम करत नाहीत. मला न्याय हवा आहे आणि न्याय देण्यास विलंब होऊ शकत नाही. सेबीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी आणि त्यांचे पैसे परत मिळावेत अशी वलावी यांची इच्छा आहे. (Kerala’s Babu George Valvi bought 3500 shares 43 years ago and forgot about it)
Sardar Udham Singh Teaser: विक्की कौशल स्टारर ‘सरदार उधम सिंह’ चा टीझर रिलीज, विकी कौशल दिसला जबरदस्त लूकमध्ये https://t.co/isy7K68ryp#VickyKaushal #SardarUdhamOnPrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2021
इतर बातम्या