UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं

काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ विविध राजकीय पक्षांकडून लखीमपूरमधला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे.

UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं
Lakhimpur Kheri violence
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 9:39 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ विविध राजकीय पक्षांकडून लखीमपूरमधला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे. टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागून गाडी येते आणि जोरात धडक देऊन त्यांना चिरडते असं व्हिडीओमध्ये दिसतं. काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा व्हिडीओ लखीमपूरमधला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडीचा चालक कोण?

काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “लखीमपूर खीरीतील वेदनादायी दृश्य” असं काँग्रेसने म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये गाडी नेमकं कोण चालवत आहे हे दिसत नाही. मात्र आंदोलन करणाऱ्या पगडीधारक शेतकऱ्याला मागून धडक दिली जाते आणि गाडी त्याच्या अंगावरुन जाते हे या व्हिडीओमध्ये दिसतं.

8 जणांचा मृत्यू

रविवारी 3 ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. लखीमपूर खीरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रियांका गांधी दोन दिवसांपासून नजरकैदेत

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी लखीमपूर खीरीला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanaka Gandhi) आणि यूपी पोलिसांमध्ये (UP Police) रविवारी रात्री चांगलाच वाद झालेला पाहायला मिळाला. त्यावेळी प्रियकां गांधींना यूपी पोलिसांच्या चांगलीच खरडपट्टी काढली. पोलिसांना थेट आव्हान देत, अंगाला हात तर लावून दाखवा, कायदा आम्हालाही कळतो म्हणत, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं.

रात्री उशीरा प्रियंका गांधीही घटानस्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र यूपी पोलिसांनी त्यांना सीतापूरच्या हरगावमधून ताब्यात घेतलं.

सकाळी सकाळीच ताब्यात

लखीमपूर हिंसेच्या घटनेनंतर प्रियंका गांधी या रात्री उशिरा लखनऊला पोहोचल्या. त्या लखनऊ येथील त्यांच्या घरी आल्यावर त्यांच्या घराबाहेर 300 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 150 महिला कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते. रात्री 12 वाजता प्रियंका या लखऊनवरून लखीमपूरसाठी निघाल्या. तब्बल पाच तास प्रवास केल्यानंतर त्या लखीमपूरला पोहोचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्ये ताब्यात घेऊन सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं.

लखीमपूरमध्ये नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या  

Lakhimpur Kheri Violence : “अंगाला हात तर लावून दाखवा”, प्रियंका गांधी यूपी पोलिसांवर कडाडल्या, यूपी पोलिसांनाच दिले कायद्याचे धडे

VIDEO: लखीमपूर हिंसा, हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई; प्रियंका गांधींची गांधीगिरी  

Priyanka Gandhi : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उ. प्रदेश पोलिसांच्या ताब्यात 

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.