Lakhimpur Violence: हाच तो Video ज्यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात, मंत्र्याच्या पोराच्या पलायनाचं प्रुफ?

आता शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपमधून पळतानाचा केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा व्हिडीओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राने थार जीपखाली चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

Lakhimpur Violence: हाच तो Video ज्यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात, मंत्र्याच्या पोराच्या पलायनाचं प्रुफ?
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपमधून पळतानाचा केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा व्हिडीओ समोर आल्याचा दावा केला जात आहे.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 7:01 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत. आधी शेतकऱ्यांवर गाडी चढवतानाचा व्हिडीओ समोर आला, त्यानंतर शेतकऱ्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला. आणि आता शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपमधून पळतानाचा केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा व्हिडीओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राने थार जीपखाली चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, आपण घटनास्थळी उपस्थितच नव्हतो असा दावा आता आशीष मिश्रा यांनी केला आहे. मात्र, हा व्हिडीओ खरा ठरल्यास उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात येऊ शकतं. ( Lakhimpur Kheri Violence: New Video Goes Viral. Video of Union Minister Ajay Mishra’s son Ashish Mishra getting out of Thar jeep )

काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर ही जीप पुढं जाऊन थांबते, त्यातून लोक बाहेर पडतात. तेवढ्यात खादीचा कुर्ता घातलेला व्यक्तीही बाहेर पडतो, आणि पळू लगतो असं दिसत आहे. हा खादीचा कुर्ता घातलेला व्यक्ती केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशीष मिश्राच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

व्हायरल होणारा नवा व्हिडीओ:

आशीष मिश्रा म्हणतो, “मी तिथं उपस्थितच नव्हतो!”

दरम्यान, केंद्रीय मंत्री आशीष मिश्राने याबाबत आधीच सांगितलं आहे की, तो घटनास्थळी गेलाच नाही. ज्या ठिकाणी दंगल म्हणजे पैलवानांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याच शाळेत तो संपूर्णवेळ उपस्थित होता. कार्यक्रमाची जबाबदारी आपल्यावर असल्याने आपण कुठेही गेलो नाही, वाटलंस तर इतरांना विचारा असंही आशीष मिश्रा सांगतो आहे. आशीष मिश्राच्या नावावर असलेली थार जीप, लाखीमपूरमध्ये कशी पोहचली असं विचारल्यावर आशीष म्हणतो की, पाहुण्यांना घेण्यासाठी माझ्या जीपने काही कार्यकर्ते गेले होते, पण त्या कार्यकर्त्यांमध्ये मी नव्हतो.

प्रशासनाने मार्ग बदलला तरी थार जीप जुन्या मार्गाने कशी?

या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा, आशीष मिश्रा आणि योगी सरकारला अडचणीत आणणारा हा प्रश्न आहे. कारण, शेतकरी हेलिपॅडवर आंदोलन करत आहे, हे कळाल्यावर प्रशासनान केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मार्ग बदलला. त्यांना हेलिकॉप्टरने आणण्याऐवजी त्यांना वेगळ्या रस्तेमार्गाने आणण्यात आलं. याची सूचना आधीच प्रशासनाने आयोजकांना दिली होती. ही सूचना असतानाही, आशीष मिश्राची गाडी लाखीमपूरमध्ये कशी पोहचली हा प्रश्नच आहे. या प्रश्नाचं आशीष मिश्रालाही समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही. त्यात आता समोर आलेला हा व्हिडीओ आशीष मिश्रांच्या अडचणी वाढवू शकतो.

हेही वाचा:

Lakhimpur Violence: गाडीने चिरडल्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू, तर मारहाणीत 4 इतर लोकांचा मृत्यू, वाचा मृत्यू पावलेल्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

Priyanka Gandhi Arrested : आधी नजरकैद, आता अटक, प्रियांका गांधींवर UP पोलिसांकडून 36 तासांनी कारवाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.