AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakhimpur Violence: गाडीने चिरडल्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू, तर मारहाणीत 4 इतर लोकांचा मृत्यू, वाचा मृत्यू पावलेल्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

या हिंसाचारात ठार झालेल्या 8 जणांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालानुसार, बहुतेक मृत्यू हे जबर मार, शॉक किंवा रक्तस्त्राव झाल्यामुळे झाले आहेत, पोस्टमॉर्टम अहवालात कुणालाही गोळी लागल्याचा उल्लेख नाही.

Lakhimpur Violence: गाडीने चिरडल्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू, तर मारहाणीत 4 इतर लोकांचा मृत्यू, वाचा मृत्यू पावलेल्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?
शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले आहे की, वाहनाखाली चिरडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 12:31 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये रविवारी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, या घटनेत आणि यानंतर झालेल्या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे. ठार झालेल्यांमध्ये 4 शेतकरी, 2 भाजप कार्यकर्ते, 1 अजय मिश्राचा चालक आणि एक स्थानिक पत्रकार यांचा समावेश आहे. या हिंसाचारात ठार झालेल्या 8 जणांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालानुसार, बहुतेक मृत्यू हे जबर मार, शॉक किंवा रक्तस्त्राव झाल्यामुळे झाले आहेत, पोस्टमॉर्टम अहवालात कुणालाही गोळी लागल्याचा उल्लेख नाही. ( lakhimpur-kheri-violence-post-mortem-report-of-4-farmers-crushed-by-car-and-4-others-killed-in-violence-death-due-to-injury-shock-and-hemorrhage)

शवविच्छेदन अहवालानुसार कुणाच्या मृत्यूचे काय कारण?

4 शेतकऱ्यांचा मृत्यू

  • 1. लव्हप्रीत सिंग (शेतकरी) मृत्यूचे कारण-रोडवर फरफटत नेल्याने मृत्यू, शरीरावर जखमेच्या खुणा, धक्का आणि रक्तस्त्रावाने मृत्यू
  • 2. गुरविंदर सिंग (शेतकरी) मृत्यूचे कारण – दोन जखमा आणि स्क्रॅचच्या खुणा आढळल्या. तीक्ष्ण हत्यारं किंवा तीक्ष्ण वस्तूमुळे झालेली दुखापत. धक्का आणि रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू
  • 3. दलजीत सिंग (शेतकरी) मृत्यूचे कारण- शरीराखाली अनेक ठिकाणी फरफटत नेल्याच्या खुणा, गाडीखाली आल्यामुळे जखमांची शक्यता
  • 4. छत्रसिंग (शेतकरी) मृत्यूचे कारण- जोरदार धक्का, रक्तस्त्राव आणि मृत्यूपूर्वी कोमात गेले. अंगावर फरफटत नेल्याच्याही खुणाही सापडल्या.

हिंसाचारात इतर 4 ठार:

  • 5. शुभम मिश्रा (भाजप नेते) मृत्यूचे कारण- लाठ्यांकाठ्यांनी मारणे. शरीरावर डझनहून अधिक ठिकाणी जखमा, मारहाणीच्या खुणा आढळल्या.
  • 6. हरी ओम मिश्रा (अजय मिश्राचा चालक) मृत्यूचे कारण- लाठ्यांकाठ्यांनी मारणे. शरीरावर अनेक ठिकाणी दुखापतीच्या खुणा आहेत. मृत्यूपूर्वी धक्का आणि रक्तस्त्राव.
  • 7. श्याम सुंदर (भाजपा कार्यकर्ता) मृत्यूचे कारण- काठ्यांनी मारहाण. या अपघातात डझनहून अधिक जखमा
  • 8. रमण कश्यप (स्थानिक पत्रकार) मृत्यूचे कारण- शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा. धक्का आणि रक्तस्त्रावामुळे मृत्यू.

गाडीने फरफटत नेल्यानेच शेतकऱ्यांचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले आहे की, वाहनाखाली चिरडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. खेचल्यामुळे शेतकऱ्यांच्या शरीरावर खोल जखमा आहेत. दुसरीकडे, भाजप कार्यकर्ता, ड्रायव्हर आणि पत्रकाराच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. सोमवारी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात एक करार झाला. हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हिंसाचारात जखमी झालेल्यांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. याशिवाय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील.

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वी हिंसा भडकली

रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य वेळापत्रकानुसार लखीमपूर खेरीच्या दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनेच शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप झाला. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवल्यानंतर हिंसाचार उसळला. गाडीने चिरडल्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि त्या बदल्यात चालक आणि दोन भाजप कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या जमावाने मारहाण केली. या प्रकरणी आशिष मिश्राविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं

Lakhimpur Kheri Violence : “अंगाला हात तर लावून दाखवा”, प्रियंका गांधी यूपी पोलिसांवर कडाडल्या, यूपी पोलिसांनाच दिले कायद्याचे धडे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.