Lakhimpur Kheri Voilence: सुप्रीम कोर्टात उद्या लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुनावणी

लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या, 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारला साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

Lakhimpur Kheri Voilence: सुप्रीम कोर्टात उद्या लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुनावणी
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 9:31 PM

नवी दिल्लीः लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या, 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारला साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते. (Lakhimpur Kheri Voilence of Uttar Pradesh Supreme Court hearing tomorrow)

फौजदारी प्रक्रिया (CrPC) च्या कलम 164 अंतर्गत इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी जलद करण्याचे पण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. खंडपीठाने राज्य सरकारकडे चार आंदोलक शेतकर्‍यांवर गाडी चडवल्यानंतर, एका पत्रकाराची आणि श्याम सुंदर नावाच्या व्याक्तीची जमावाने केलेल्या कथित हत्येचा अहवालही मागवला होता.

काय आहे हे प्रकरण

3 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यादरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत असताना लखीमपूर खीरी येथे एका गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले होते. या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यात दोन भाजप कार्यकर्ते, एक ड्रायवर आणि एका पत्रकाराचा सामावेश होता.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह अनेक आरोपींना अटक केली आहे.

दोन वकिलांनी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी करणारे पत्र सरन्यायाधीशांना लिहले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Other News

नरेंद्र मोदींचा जगभर डंका, जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ब्रिटन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही पछाडले

Special Report: जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू, श्रीमंत क्रिकेट बोर्ड, तरी विश्वचषकातून भारत बाहेर, नेमकी माशी कुठे शिंकली?

Elections 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व 117 जागा लढवणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.