देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल; राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राजधारी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राजधारी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. (discussion between ShivSena MP Sanjay Raut and Congress leader Rahul Gandhi)
राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहू द्या, असं संजय राऊत म्हणाले. लखीमपूरला विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जाणार का? असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला. त्यावेळी याबाबतही चर्चा झाली आहे. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल, असं राऊत म्हणाले. देशात लोकशाही उरली आहे का? देशात जे काही सुरु आहे त्यावर आम्ही चर्चा केली. लोकशाही व्यवस्था पूर्णपणे ध्वस्त झाली आहे. राहुल गांधींसोबत राजकीय चर्चा झाली. आता विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलंय.
राहुल गांधींच्या भेटीपूर्वी राऊतांचं ट्वीट
लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारनं अटक केलीय. विरोधी नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात येतोय. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे. राहुल गांधी यांना दुपारी सव्वा चार वाजता भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली होती.
#LakhimpurKheriViolence has shaken the nation,@priyankagandhi has been arrested UP govt, opposition leaders are being restricted from meeting farmers. There is need for joint opposition action against oppression by Government in UP. Meeting @RahulGandhi at 4.15 pm today जय हिंद!
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2021
प्रियंका गांधींना पोलिसांकडून अटक
सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली आहे.
प्रियांका गांधींना काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.
इतर बातम्या :
हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप, घोटाळ्यात सतेज पाटलांनी मदत केल्याचा दावा!
दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Lakhimpur Violence discussion between Shiv Sena MP Sanjay Raut and Congress leader Rahul Gandhi