Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC ला का विकावी लागणार आपली संपत्ती, मेट्रो शहरातील इमारती विकणार कारण…

LIC sell his land: एलआयसीने यापूर्वी संपत्ती विक्रीचा प्रयत्न केला होता. परंतु कायदेशीर वादामुळे संपत्तीची विक्री झाली नाही. एलआयसीची अनेक इमारतीवर कायदेशीर दावे सुरु आहेत. सन 2024 मध्ये कंपनीचा एकूण प्रीमियममध्ये केवळ 0.22 वाढ झाली.

LIC ला का विकावी लागणार आपली संपत्ती, मेट्रो शहरातील इमारती विकणार कारण...
lic
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 1:10 PM

भारतीय जीवन बिमा निगम ( LIC ) देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या या कंपनीने आपली संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसी मेट्रो शहरातील आपली संपत्ती विकून 50 ते 60 हजार कोटी रुपये जमवणार आहे. त्यासाठी एलआयसी आपले प्लॉट आणि व्यावसायिक प्रॉपर्टी विकणार आहे. एलआयसीचे अनेक शहरांमध्ये प्राइम लोकेशनवर प्लॉट अन् कमर्शियल बिल्डींग आहेत. त्यात दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये जीवन भारती बिल्डिंग, कोलकातामधील चितरंजन एवेन्यूमध्ये असणारी एलआयसी बिल्डिंग, मुंबईमधील प्राइम लोकेशनवर असणाऱ्या बिल्डिंग्सचा समावेश आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध हिल स्टेशन मसूरीमधील मॉल रोडवर असणारी एसबीआय बिल्डिंग एलआयसीची आहे.

कंपनीच्या संपत्तीचे मूल्यांकन होणार

रिपोर्टनुसार, एलआयसी एका प्लॅनवर काम करत आहे. कंपनी मूल्यांकनासंदर्भात आढावा घेत आहे. आता एलआयसी कंपनीच्या इमारतींचे नवीन मूल्यांकन करण्याचा विचारात आहे. शेवटच्या मूल्यांकनानुसार, एलआयसीची रिअल इस्टेट मालमत्ता 50,000 ते 60,000 कोटी रुपयांची होती. परंतु व्यावसायिक किमत त्याच्या पाच पट असू शकते. एलआयसीकडे 51 लाख कोटींची संपत्ती आहे.

का विकणार एलआयसी संपत्ती

आर्थिक वर्ष 2024 मध्ये एलआयसीचा नफा 40,676 कोटी रुपये होतो. मागील वर्षी हाच नफा 36,397 कोटी रुपये होता. एलआयसीने आपली संपत्ती विकल्यावर कंपनीचा नफा वाढणार आहे. विक्रीनंतर नवीन मालकाला त्या जागेचा पुनर्विकास करणे, नवीन पद्धतीने इमारती उभारणे अशी कामे करता येतील. या प्रक्रियेसाठी एखादी नवीन कंपनी बनवता येईल. कंपनीकडे देशातील अनेक प्राइम लोकेशनवर बिल्डींग आहे. परंतु ती विकण्यासाठी एलआयसीला कायद्यात काही सुधारणा कराव्या लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी झाला संपत्ती विक्रीचा प्रयत्न

एलआयसीने यापूर्वी संपत्ती विक्रीचा प्रयत्न केला होता. परंतु कायदेशीर वादामुळे संपत्तीची विक्री झाली नाही. एलआयसीची अनेक इमारतीवर कायदेशीर दावे सुरु आहेत. सन 2024 मध्ये कंपनीचा एकूण प्रीमियममध्ये केवळ 0.22 वाढ झाली. एकूण 4.75 ट्रिलियन रुपये प्रीमियम एलआयसीला मिळाले. त्यामुळे एलआयसीला इतर खासगी विमा कंपन्या जोरदार टक्कर देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.