खासदारांमध्ये टी20 सामना, अनुराग ठाकूर, मनोज तिवारी, चंद्रशेखर यांच्याकडून चौकार, षटकारांची आतिषबाजी, अखेर विजय…

TB Awareness MPs Cricket: किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 178 धावा करता आल्या. अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा अध्यक्षांच्या इलेव्हन संघाकडून रिजिजू यांचा संघ 73 धावांनी पराभव झाला.

खासदारांमध्ये टी20 सामना, अनुराग ठाकूर, मनोज तिवारी, चंद्रशेखर यांच्याकडून चौकार, षटकारांची आतिषबाजी, अखेर विजय...
खासदारांचा क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 5:47 PM

TB Awareness MPs Cricket: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशात संसदेत सत्ताधारी आणि विरोधक चौकार, षटकार मारत आहेत. परंतु हेच खासदार रविवारी मैदानात उतरले. त्यांनी टी20 सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. टीबी आजाराविरोधात जनजागृतीसाठी हा सामना झाला. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये लोकसभा अध्यक्ष इलेव्हन आणि राज्यसभा सभापती इलेव्हन यांच्यात हा सामना झाला. खासदारांच्या जर्सीवर ‘टीबी हारेगा और भारत जीतेगा’ असे घोषवाक्य लिहिले होते.

ठाकूर यांच्या संघाचा धावांचा डोंगर

लोकसभा अध्यक्ष एकादशचे नेतृत्व अनुराग ठाकूर यांनी केला. तर राज्यसभा सभापती इलेव्हन संघाचे नेतृत्व किरेन रिजिजू यांनी केले. लोकसभा इलेव्हन संघाने पहिले फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेटवर 251 धावांचा डोंगर केला. लोकसभा इलेव्हनची सुरुवात चांगली राहिली नाही. 20 धावांच्या आत त्याचे दोन्ही सलामीचे फलंदाज – मनोज तिवारी आणि दीपेंद्र सिंग हुडा पॅव्हेलियनमध्ये परतले. किरेन रिजिजू यांनी सहा धावसंख्येवर हुड्डाला एलबीडब्ल्यू आऊट केले.

अनुराग ठाकूर यांची शतकी भागेदारी

13 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर सौमित्र खानच्या चेंडूवर मनोज तिवारी झेलबाद झाले. यानंतर कर्णधार अनुराग ठाकूर यांनी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत शतकी भागीदारी केली. अनुराग यांनी 65 चेंडूत नाबाद 111 धावांची तुफानी खेळी केली. त्यांना चंद्रशेखर यांनी 23 चेंडूत 54 धावा करत चांगली साथ दिली. कमलेश पासवान यांनी चंद्रशेखर यांना क्लीन बोल्ड करून ही भागीदारी तोडली.

हे सुद्धा वाचा

रिजिजू यांचा संघ ढेपाळला

लोकसभा इलेव्हनने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राज्यसभा इलेव्हन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार किरेन रिजिजू केवळ 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. राम मोहन नायडू यांच्या चेंडूवर त्यांना यष्टिरक्षक दिनेश शाक्य यांनी बाद केले. यानंतर अझर यांनी कमलेश पासवान यांच्यासह डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. दीपेंद्रसिंग हुडा यांनी कमलेश यांना बाद कुरुन ही भागीदारी तोडली. त्यांनी 26 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या इम्रान प्रतापगढी यांना खातेही उघडता आले नाही. हुडा यांनी त्यांना क्लीन बोल्ड केले. अझर यांनी बाद होण्यापूर्वी 42 चेंडूत 74 धावा केल्या.

दीपेंद्र हुड्डा यांनी नीरज डांगी आणि सीएम रमेश यांना धावबाद करून राज्यसभा इलेव्हनच्या अडचणी वाढवल्या. डांगी यांना 28 तर रमेश यांना 2 धावा करता आल्या. के सुधाकर 27 धावा करून निवृत्त झाले. अरुण यादव 5 धावांवर निशिकांत दुबे यांच्या गोलंदाजीवर बाद झाले. किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 178 धावा करता आल्या. अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा अध्यक्षांच्या इलेव्हन संघाकडून रिजिजू यांचा संघ 73 धावांनी पराभव झाला.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....