जबरदस्त ऑफर, मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये डिस्काउंट मिळणार
Lok Sabha Election: मतदानाच्या ४८ तासांपूर्वी ड्राय डे असणार आहे. या दरम्यान मद्याची सर्व दुकाने बंद असणार आहेत. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून १९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ड्राय डे असणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. आता पहिला टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली आहे. १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशातील १०२ जागांवर मतदार होणार आहे. उमेदवार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. निवडणूक आयोगाकडून मतदान करण्यासंदर्भात जनजागृती मोहीम सुरु असते. आता निवडणूक आयोगाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्तरखंड निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऑफर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेल आणि रेस्तरांमध्ये २० टक्के डिस्काउंट द्यावे, असा प्रस्ताव हॉटेल असोशिएशनकडून ठेवण्यात आला आहे. उत्तराखंड निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव हॉटेल असोशिएशनपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे.
अशी असणार ऑफर
उत्तराखंड निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जगजागृती करण्याबरोबर ऑफर सुरु केली आहे. आयोगाने हॉटेल असोशिएशनपुढे १९ एप्रिल रोजी मतदानाचा टक्का वाढल्यास २० एप्रिल रोजी हॉटेलमध्ये २० टक्के डिस्काउंट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त विजयकुमार जोगदंडे यांनी म्हटले की, उत्तराखंडमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक संघटनांशी चर्चा सुरु आहे. हॉटेल असोशिएशनसह इतर संघटनांपुढे हा प्रस्ताव मांडला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी दोन हेलिकॉप्टर
निवडणूक आयोगाने निवडणूक कामासाठी असणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा दलासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केले आहे. आपात्कालीन परिस्थितीत या हेलिकॉप्टरचा वापर करता येणार आहे. जोपर्यंत निवडणुकीसाठी काम करणाऱ्या टीमचे कामकाज संपणार नाही, तोपर्यंत हे हेलिकॉप्टर तैनात असणार आहे. वैद्यकीय कारणासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर करता येणार आहे.
मतदानाच्या दिवशी ड्राय डे
मतदानाच्या ४८ तासांपूर्वी ड्राय डे असणार आहे. या दरम्यान मद्याची सर्व दुकाने बंद असणार आहेत. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून १९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ड्राय डे असणार आहे. तसेच मतदान असणाऱ्या तीन किलोमीटर परिसरात मतदान नसणाऱ्या भागात मद्याची दुकाने असतील तरी ते बंद असणार आहेत.