Hema Meena : सहा महिन्यांपूर्वी लाइन बनून इंजिनिअरचा घरी गेले डीएसपी, खबर पक्की झाल्यानंतर बनवला प्लॅन
Raid on MP engineer : मध्य प्रदेशातील एक इंजिनिअर सध्या चर्चेत आहे. तिच्याकडे सात कोटींची संपत्ती सापडली आहे. तिचा पगार फक्त ३० हजार रुपये आहे. तिच्या घरावर छापा टाकण्यापूर्वी सहा महिन्यांपासून पोलिसांची टीम काम करत होती.
भोपाळ : मध्यप्रदेशातील हॉसिंग कॉर्पोरेशनच्या सहायक इंजिनिअर हेमा मीनाच्या घरी लोकायुक्तांनी (lokayukta raid) छापेमारी केली. या छापेमारीत लोकायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना इतकं घबाड सापडलं आहे की तेही चक्रावून गेले आहेत. मध्य प्रदेशात लोकायुक्तांनी एका टाकलेल्या छाप्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या कारवाईत बिलखिरिया येथील मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळातील सहायक अभियंता प्रभारी हेमा मीना यांच्या घरातून बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. तिचा पगार फक्त ३० हजार रुपये आहे. हेमाच्या संपत्तीचा अंदाज एकाच गोष्टीवरून लावता येईल की तिच्या घरात सापडलेल्या एका टीव्ही सेटची किंमत 30 लाख रुपये आहे. तिच्याकडे सात कोटी रुपयांची संपत्ती आहे.
काय केला पाया तयार
छापेमारीनंतर सर्व प्रकार उघड झाला. परंतु हेमा मीनाच्या घरी छापे टाकणे सोपे नव्हते. दीड एकरमध्ये तिने बंगला बांधला होता. त्यावर २० फूट उंच भिंत बांधली होती. देखरेखीसाठी सुरक्षा रक्षक आणि ५० विदेशी श्वान होते. या ठिकाणी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जाणे अशक्य होते. हेमा मीनाच्या संपत्तीची बातमी लोकआयुक्तांपर्यंत गेले. त्यांनी चौकशी सुरु केली. मग २०१६ नंतर हेमा आपले वडील, भाऊ आणि आईच्या नावावर सतत जमीन विकत घेत असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी पैसा तिच्या खात्यातून जात होता. है।
कसा रचला सापळा
लोकायुक्त कार्यालयातील डीएसपी संजय शुक्ला यांनी योजना तयार केली. सहा महिन्यांपूर्वी ते आपल्या साथीदारासह बिलखिरिया येथील हेमाच्या घरी पोहचले. आधी तिच्या घराचा विद्युत पुरवठा खंडीत केला. मग लाइनमन बरोबर त्याचा सहकारी बनून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील संपत्ती आणि इतर ऐवज पाहून त्यांना धक्का बसला. मग त्यांनी छापेमारीचा प्लॅन तयार केला.
टीममध्ये पीडब्लूडी इंजिनिअर
संजय शुक्ला यांनी छापेमारीसाठी टीम तयार केली. त्यात पीडब्ल्यूडी आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश केला. यामुळे हेमाकडे गिर जातीच्या गायी आणि या परदेशी जातीच्या कुत्र्यांची किंमत काय असेल, हे कळू शकेल. येथील बांधकामाचा खर्च निश्चित करण्यासाठी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना टीममध्ये घेतले. हे मिशन अत्यंत गुप्त ठेवा, याची माहिती तुमच्या विभागातील इतर लोकांना देऊ नका, असे स्पष्ट आदेश दिले.
आता ही लोक रडारवर
छापा टाकल्यानंतर लोकायुक्त पोलिस हेमाच्या बँक खात्यातील व्यवहारांचीही चौकशी करत आहेत. हेमाचे नाव ज्या पोलिस गृहनिर्माण अभियंत्याशी जोडले जात आहे, त्याच्याशी किती वेळा व्यवहार झाले हेही पाहिले जात आहे. हेमाच्या मालमत्तेचा तपास पूर्ण झाल्यानंतर तिला पगाराव्यतिरिक्त कोणत्या खात्यांमधून पैसे मिळत होते, हे उघड होऊ शकेल, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गृहनिर्माण विभागातील इंजिनिअरसुद्ध रडारवर आहेत.
हे ही वाचा
१३ वर्षांची सरकारी नोकरी, पगार फक्त ३० हजार, कशी जमवली 7 कोटी रुपयांची संपती